शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आठ एकरांत ८० क्विंटल पेरूचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

उमरगा - पारंपरिक खरीप पीक पद्धतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत चालले आहे. त्यामुळे काही शेतकरी धाडस करून नवीन पद्धत ...

उमरगा - पारंपरिक खरीप पीक पद्धतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत चालले आहे. त्यामुळे काही शेतकरी धाडस करून नवीन पद्धत वापरून कमी पाण्यावर शेतात नवनवीन प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग तालुक्यातील बेळंब येथील येथील सहा शेतकरी एकत्र येऊन ग्रुप पद्धतीने पेरूची शेती करू लागले आहेत. हा प्रयाेग यशस्वी झाला असला तरी लाॅकडाऊनमुळे बाजारपेठेत अत्यल्प दर मिळत आहे.

तालुक्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र अधिक आहे. निसर्गावरच शेतीतील उत्पन्न अवलंबून असते. तालुक्यात मागील पाच-सहा वर्षांपासून अवेळी होणाऱ्या पावसामुळे उत्पन्नात घट होत आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतात अनेक शेतकरी फळबाग, पालेभाज्यांसह अन्य पिके घेण्याकडे वळले आहेत. असाच प्रयोग तालुक्यातील बेळंब येथील प्रयोगशील शेतकरी बसवराज वरनाळे, राजेंद्र कारभारी, श्रीकांत बाबशेट्टी, कलेश्वर येलगुंदे, अनिल बिराजदार या पाच जणांनी एकत्र येत केला आहे. तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंगराव फुंडकर फळबाग याेजनेच्या माध्यमातून आठ एकर क्षेत्रावर पेरूची लागवड केली. पेरूची राेपे, खड्डे मारणे, लागवड, ठिबक आदींवर सुमारे साडेपाच लाख खर्च आला. साधारणतः १७ महिन्यांनंतर पेरू पिकाला बहर आला आहे. पहिल्या बहरात एका पेरूचे वजन साधारणतः आठशे ते तेराशे ग्रॅम आहे. ७० ते ८० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. त्यातील पंचवीस क्विंटल पेरूची विक्री झाली आहे; परंतु बाहेर जिल्ह्यातील बाजारपेठा लॉकडाऊनमुळे बंद असल्याने किमान साठ ते सत्तर रुपये किलो मिळणारा दर वीस ते तीस रुपयांवर आल्याने अधिक मिळणारा फायदा घटला आहे.

पेरूच्या बागेचे उत्पन्न साधारणतः २० वर्षांपर्यंत घेता येते. पहिल्यांदा लागवडीचा खर्च मोठा असतो. त्यानंतर फोम, कॅरिबॅग व पेपर लावण्यासाठी खर्च येतो. पहिला पेरूचा बहर चांगला आला. मात्र, लॉकडाऊनने तो हिरावून घेतला. पुणे, हैदराबादची बाजारपेठ बंद आहे. सोलापूरला माल पाठवला मात्र दर कमी मिळाला. आता सोलापूर बाजारपेठही उपलब्ध होत नाही. सद्य:स्थितीत पिकलेले वजनदार पेरू खाली पडताहेत. लॉकडाऊनची स्थिती नसती तर ८ एकरांतून किमान २० ते २५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले असते.

चाैकट...

पेरू उत्पादक शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव व कृषी सहायक सुतार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. प्रत्यक्षात शिवारात जाऊन पाहणी केली. आज घडीला चांगल्या पद्धतीने बाग व फळ येत असल्याचे पाहून बेळंब येथील या शेतकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. अन्य शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन पद्धतीने शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

आम्ही पाच जणांनी मिळून आठ एकरांत पेरूची लागवड केली. कृषी विभागाच्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हा प्रयोग यशस्वी करता आला. आता पेरूचा बहर आला असला तरी लॉकडाऊनमुळे बाजारपेठ मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे अल्पदरात विक्री करावी लागत आहे.

राज कारभारी, प्रयोगशील शेतकरी, बेळंब