शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महिलांनी गटारीच्या पाण्याची पूजा करून केली पालिकेविरोधात गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 17:36 IST

पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणात शहराच्या विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. या प्रकाराबाबत नागरिकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

ठळक मुद्दे बँक कॉलनी भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, लाईट व गटारीचा प्रश्न बिकट झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनासह पदाधिकारी दखल घेत नसल्याने केली गांधीगिरी

उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणात शहराच्या विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. या प्रकाराबाबत नागरिकांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग ७ मधील महिलांनी नालीची पूजा करून गांधीगिरी करत पालिकेच्या कारभाराची लक्तरे काढली. 

उमरगा शहरातील प्रभाग ७ मधील शासकीय दूध डेअरी पाठीमागे व डिग्गी रोडलगत असलेल्या भू-विकास बँक कॉलनी भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, लाईट व गटारीचा प्रश्न बिकट झाला आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी पालिकेला व प्रभागाच्या नगरसेवकास निवेदन देऊन व वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले, असा आरोप येथील रहिवाशांतून होत आहे.  विशेष म्हणजे या प्रभागाचे नगरसेवक संजय पवार हे पालिकेतील गटनेते आहेत.

दरम्यान, वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनासह पदाधिकारी दखल घेत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वैतागलेल्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आज परिसरात जागोजागी साचलेल्या गटारीच्या घाण पाण्याचे पूजन करत गांधीगिरी केली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सुनंदा माने, सचिव मीरा चव्हाण, उपाध्यक्षा श्रीदेवी बिराजदार, संगटक सुनीता सुगावे, महिला बचत गटाच्या कविता पाटील, संगीता पाटील, सुधामती कवठे, राजश्री महाजन, विजया तपसाळे, कविता जाधव, शशिकला पाटील, जगदेवी पाटील, सुनीता तांबोळी, दीपिका झपरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

तर तीव्र आंदोलन करूअसुविधांबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. प्रशासनासह पदाधिका-यांचे लक्ष वेधण्यासाठीच शुक्रवारी गांधीगिरी करण्यात आली आहे. यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.