शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न ? चौथ्या मजल्यावरून पडल्याने प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:22 IST

या दुर्घटनेला लैंगिक छळाची किनार

ठळक मुद्देहा अपघात होता की आत्महत्येचा प्रयत्न, याची आता चौकशी होत आहे. त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. 

उस्मानाबाद : येथील शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मनीषा गिरी या आज सकाळी राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, हा अपघात होता की आत्महत्येचा प्रयत्न, याची आता चौकशी होत आहे. या दुर्घटनेला लैंगिक छळाची किनारही देण्यात येत आहे.

उस्मानाबाद शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक मनीषा गिरी या त्या राहत असलेल्या घराच्या चौथ्या मजल्यावरून शुक्रवारी सकाळी खाली पडल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला व अन्य ठिकाणी जबर मार बसला आहे. शरीरात 2 ते 3 फ्रॅक्चर झाले असून, रक्तस्रावही बराच झाला आहे. बेशुद्धावस्थेत त्यांना जवळीलच एक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. 

लैंगिक छळाची दुर्घटनेला किनार...दरम्यान, मनीषा गिरी यांच्या काही नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दोन महिन्यांपूर्वी त्या कार्यरत असलेल्या आनंदनगर ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने लज्जास्पद वागणूक दिल्याची तक्रार गिरी यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, त्यांचा अहवाल अद्याप पूर्ण झाला नाही. यादरम्यान, काही विकृत गिरी यांना ब्लॅकमेल करीत असल्याने, त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा दावा त्यांचे नातेवाईक करीत आहेत.

तथ्य आढळल्यास तात्काळ कारवाई : पोलीस अधीक्षकहा अपघात की आत्महत्या, हे गिरीच स्पष्टपणे सांगू शकतील. आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. शुद्धीत आल्यानंतर दिलेल्या जबाबानुसार कार्यवाही होईल. छळ प्रकरणाची चौकशी लावली असून, त्याचा अहवाल मागविला आहे. यातील दोषींवर तातडीने कारवाई होईल, असे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.