शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या मोबाईलला वैतागल्या बायका; भरोसा सेलमध्ये २९३ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

पतीचे परस्त्रीबरोबरचे संबंध असल्याचा संशय, पतीचे दारुचे व्यसन, पती चारित्र्यावर संशय घेतो, पती काम-धंदा न करता सतत मोबाईलवर वेळ ...

पतीचे परस्त्रीबरोबरचे संबंध असल्याचा संशय, पतीचे दारुचे व्यसन, पती चारित्र्यावर संशय घेतो, पती काम-धंदा न करता सतत मोबाईलवर वेळ घालवितो. यातूनच पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात. या तक्रारी घेऊन महिला पोलीस ठाण्यात येतात. त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा नोंद करुन त्यांना भरोसा सेलकडे पाठविण्यात येत असते. मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यात महिला तक्रार निवारण केंद्र सुरु होते. या केंद्राकडे २०१९ मध्ये ४४६ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी २२४ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली. १३६ प्रकरणे निकाली निघाले. तर एप्रिल २०२० ते नोव्हेंबर अखेर २९३ प्रकरणे भरोसा सेलकडे दाखल झाली होती. त्यातील ९० प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली. ५ पोस्टेड वर्ग, १६ जणांना कोर्टात जाण्याची समज दिलेली आहे. ३५ प्रकरणे निकाली निघाले, १४७ प्रकरणे प्रलंबित आहेत.

नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणे

विवाहानंतर काही वर्षात नवरा-बायकोमध्ये वाद होत आहेत. त्यात चारित्र्यावरुन संशय, वाढती व्यसनाधिता याबरोबर दिवसागणिक वाढत चालेला सोशल मिडीयाचा वापरही भांडणाचे कारण भरत असल्याचे भरोसा सेलमधील आलेल्या तक्रारीवरुन पुढे येत आहे. पती दारुच्या आहारी जाऊन पत्नीस मारहाण करीत असल्याने अनेक महिला भरोसा सेलकडे तक्रारी करीत आहेत. शिवाय, काम-धंदा न करता नवरा सतत मोबाईलवर व्यस्त राहत असल्याचे मुख्य कारण आहे.

९० प्रकरणांत समेट

भरोसा सेलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा अभ्यास करुन तक्रारदारांना समुपदेशन करण्यात आले. तक्रारदार व समोरील व्यक्तींचे म्हणणे ऐकून दोघांनाही जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली. २०२० नोव्हेंबरअखेरर्पंत दाखल झालेल्या २९३ प्रकरणांपैकी ९० प्रकरणांमध्ये समझाेता केल्याचे भरोसा सेलकडून सांगण्यात आले.

कोट...

भरोसा सेलकडे ग्रामीण भागातील महिला पती दारु पित असल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. पती चारित्र्यावर संशय घेतो. तसेच मोबाईलवर टाईमपास करतो. अशा तक्रारी महिला घेऊन येतात. नोव्हेंबर पर्यंत ९० प्रकरणात समझोता झाला आहे. तर ३५ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.

प्रीती सावंत, पोलीस उपनिरीक्षक,

प्रभारी भरोसा सेल प्रमुख