शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न आता काजळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:32 IST

पाच कामे पूर्ण - लोकसहभागातून रूपडे पालटले... उस्मानाबाद: शेतकऱ्यांनी आणि गाव पुढाऱ्यांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते याचे ...

पाच कामे पूर्ण - लोकसहभागातून रूपडे पालटले...

उस्मानाबाद: शेतकऱ्यांनी आणि गाव पुढाऱ्यांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण काजळा (ता. उस्मानाबाद) येथे पाहावयास मिळत आहे. शेतरस्त्याच्या सारोळा पॅटर्नची प्रेरणा घेऊन काजळा गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून शेत रस्त्याची मोहीम हाती घेऊन ती यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आतापर्यंत पाच रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून मातीकामासह मजबुतीकरणही करण्यात आले आहे.

गाव तिथे शेतरस्त्याची जटील समस्या उभी राहतेच. वर्षानुवर्षे बांध आणि शेतरस्त्यावरून वाद-विवाद आणि मग पोलीस स्टेशन, कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची वेळ येते. उत्पन्नापेक्षा रस्त्याच्या वादामुळेच अधिक खर्च व्हायचा. हीच कटकट कायमस्वरूपी मिटविण्यासाठी काजळा गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतरस्त्याचा सारोळा पॅटर्न राबविण्याचे ठरविले. अवघ्या काही दिवसात शेतकऱ्यांचा लोकसहभाग आणि वर्गणीतून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. बघता-बघता पाच शेतरस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. केवळ मातीकामच नव्हे तर मजबुतीकरणही शेतकऱ्यांनी केले आहे. यासाठी शासन-प्रशासनाचा एक दमडीचाही निधी न घेता ही कामे सुरू आहेत. आतापर्यंत पाच रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून सहाव्या रस्त्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. तसेच जवळपास २० रस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्ता कामास सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शनिवारी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. शेतरस्त्याची मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच चंद्रकांत मडके, रामचंद्र कदम, मनोज कदम, प्रमोद कदम, दादा शेळके,अविनाश शेळके, विकास राऊत, अमोल मडके, प्रशांत कदम, बाबुराव मडके, दादा धामणे, फुलचंद धामणे, अमोल कदम, विशाल राऊत, सागर शेळके, अनिल भोसले, करण शेळके आदी परिश्रम घेत आहेत.