खामसवाडीत दुधगावकर यांचा सत्कार
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी उपध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा खामसवाडी येथे भारतीय छावा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, सुशील शेळके, शंकर तांदळे, सचिन शेळके, चंद्रकांत पाटील, गाेपाळ शेळके, संजय काेळी, अमर शेळके आदींची उपस्थिती हाेती.
१६ गावांना पर्जन्यमापक यंत्र भेट
उस्मानाबाद - लाेहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबाेधिनी व ग्रामपंचायत जलदूत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १६ गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्र भेट देण्यात आली. यात उमरगा तालुक्यातील तीन, कळंब दाेन, उस्मानाबाद तालुक्यातील अकरा गावांचा समावेश आहे. यावेळी सुहास पाठक यांच्यासह २५ गावांतील जलदूत व प्रबाेधिनीचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.