घरफोडीतील चोर रकमेसह पकडला
उस्मानाबाद : एका घराचे कुलूप नकली चावीद्वारे उघडून आतील ८० हजार रुपये चाेरून नेल्याची घटना उस्मानाबाद शहरात ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान घडली होती. या चोरीतील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चोरीतील ७७ हजार रुपये रक्कम जप्त केली.
उस्मानाबाद शहरातील सुलतानपुरा परिसरातील आकाश थिटे यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने नकली चावीद्वारे उघडून आतील लाकडी पेटीत ठेवलेले ८० हजार रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी आकाश थिटे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश थिटे यांचा भाऊ सचिन थिटे यास ८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील ७७ हजार रुपये जप्त केले. सचिन यास पुढील तपासासाठी आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.