शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेसाठी वेटिंग; दररोज २५० वर काॅल्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:05 IST

रुग्ण वाहिकेत ‘बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टम’ आणि अद्ययावत वैद्यकीय उपचार उपकरणांचा समावेश आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत १०८ क्रमांकाच्या १५ रुग्णवाहिका असून, दररोज २५० च्या वर काॅल्स येतात. कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांचे प्रमाणही वाढल्यामुळे बराच वेळ रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

आपत्कालीन स्थितीत रुग्णास उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. गोल्डन अवरमध्ये रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी शासनाने १०८ क्रमांकाची सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर आता कोरोना रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेवर भार वाढला आहे.

जिल्ह्यात अशा १५ रुग्णवाहिका धावतात. रुग्ण वाहिकेत ‘बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टम’ आणि अद्ययावत वैद्यकीय उपचार उपकरणांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात २ हजार ६५८ प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. फोन आल्यानंतर २० ते ३० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचते व रुग्णास तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांना लातूर, अंबेजोगाई, सोलापूर या ठिकाणी रुग्णवाहिकेतून पोहोचविले जात असल्याचे समन्वयक जयराम शिंदे यांनी सांगितले.

काॅल केल्यानंतर अर्ध्या तासात रुग्णवाहिका हजरशहरातून काॅल आल्यानंतर १० ते १५ मिनिटांत रुग्णवाहिका हजर होते; परंतु शहराच्या बाहेरुन काॅल आल्यानंतर अर्धा तास लागतो. कधी कधी रुग्णवाहिकेला काॅल केल्यानंतर वेटिंगवर राहावे लागते. अशावेळी जीव कासावीस होतो. रुग्णांची स्थिती पाहून वारंवार फोन करावा लागतो. नातेवाइकांनी रुग्णांकरिता बेड शिल्लक आहेत का? याची शहानिशा करावी त्यानंतरच काॅल केल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही.

रुग्णवाहिकेची मागणीजिल्ह्यासाठी सद्यस्थितीत १५ रुग्णवाहिका आहेत. रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात रुग्णवाहिकेची संख्या वाढविणे गरजेचे आहे. अनेकदा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे नातेवाइकांना इतर रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो.

जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिका : १५ग्रामीण भागातून येणारे काॅल्स : ६८ %शहरातून येणारे काॅल्स २२ %

कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूकमहिना कोरोना इतरजानेवारी २०२ ६०३फेब्रुवारी १७१ ५८२मार्च ७०५ ३९५

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdoctorडॉक्टर