शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

व्हॉलिबॉल असोसिएशनची तुळजापुरात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

प्रशिक्षणार्थिंना दिला निरोप उस्मानाबाद : येथील राजर्षी शाहू संगणक महाविद्यालयातील सागर काळे, राहुल काळे, अजय दोनगहू, परमेश्वर रोडडे, विनोद ...

प्रशिक्षणार्थिंना दिला निरोप

उस्मानाबाद : येथील राजर्षी शाहू संगणक महाविद्यालयातील सागर काळे, राहुल काळे, अजय दोनगहू, परमेश्वर रोडडे, विनोद कांबळे, परमेश्वर भालेराव, फकीर तोहिद, रतन सुरणार व विनोद अवतारे या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यांना महाविद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी प्रा. सुरेश शेलार, नितीन चव्हाण, देशमुख, शरीफ शेख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देडे, प्राचार्य प्रदीप भांडवले, प्रा. संदीप भांडवले, प्राचार्य प्रा. बलभीम ओव्हाळ आदी उपस्थित होते.

झोपडपट्टी शाळेला केंद्रप्रमुखांची भेट

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव झोपडपट्टी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला केंद्रप्रमुख रमाकांत वाघचौरे यांनी भेट देऊन ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. तसेच शिक्षणातील समस्या व अडचणी जाणून घेऊन विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. यावेळी मुख्याध्यापिका छाया सूर्यवंशी, सहशिक्षक आबा मगर, शालेय समिती अध्यक्षा सोनाली गुंड, समितीच्या सदस्या आशा मगर, सुलभा गुंड यांची उपस्थिती होती.

‘जनावरांना आवरा’

कळंब : शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिक तसेच वाहनधारक देखील त्रस्त झाले आहेत. रहदारीच्या मार्गावर ही जनावरे थांबत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.