शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टरांना निरोप देताना ग्रामस्थांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:33 IST

कळंब : कोंबडं आरवण्याच्या समयी गाडीची फडफड कानी पडली की लोक समजायचे खाब्या डॉक्टरांचा राऊंड सुरू झाला. खामसवाडी ...

कळंब  : कोंबडं आरवण्याच्या समयी गाडीची फडफड कानी पडली की लोक समजायचे खाब्या डॉक्टरांचा राऊंड सुरू झाला. खामसवाडी पंचक्रोशीतील नागरिकांना परिचित झालेली ही दिनचर्या व सवारी असयाची ती डॉ. खाबिया यांची. तब्बल ४५ वर्षे विसेक गावातील चार पिढ्यांना त्यांची ‘दवा’ कामी आली. गावकऱ्यांनीही त्यांना प्रेमरूपी ‘दुवा’ तितकीच दिली. यामुळे त्यांना निरोप देताना खामसरवाडीकरांचेही डोळे पाणावले होते.

दुष्काळाच्या चटक्यात होरपळलेल्या काळात साल १९७३ मध्ये विदर्भातील माणिकवाडा (ता. पुसद जि. यवतमाळ) येथील डॉ. रमेशचंद्र उत्तमचंद खाबिया यांनी वैद्यकीय सेवा देण्यासाठी आपलं ‘वऱ्हाड’ प्रांतातील ‘बिऱ्हाड’ खामसवाडीत टेकविले. खामसवाडी व लगतच्या मोहा, मंगरूळ, गोविंदपूर, नागझरवाडी, एकूरका, बोर्डा, खेर्डा आदी विसेक गावात त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. भल्या पहाटे उठणे अन्‌ गाडी घेऊन सकाळीच खेडेगावात राऊंड करत पुढं खामसवाडीकरासाठी उपलब्ध राहणे, हा त्यांचा दिनक्रम. यामुळे त्यांची गाडी, तिची फायरिंग व त्यावर बसलेली ही प्रकृती हे साऱ्या पंचक्रोशीत परिचयाचं झालं होतं. प्रत्येक घरात ओळख झालेल्या या डॉक्टरांनी नुकतीच ४५ वर्षानंतर आपल्या सेवेस पूर्णविराम दिला. आपली मुलं विदर्भात स्थिरस्थावर आहेत. पत्नीच्या निधनानंतर खचलेल्या डॉक्टरांनी उतारवय जन्मगावी घालवावे असा निर्णय घेतला. यानुसार त्यांना ग्रामस्थांनी प्रेमपूर्वक सस्नेह निरोप दिला.

चौकट....

नाममात्र शुल्क, परत मायेचा आधार...

खामसवाडी येथील खाबिया डॉक्टरांनी नाममात्र रुपयात रुग्णांची तपासणी केली. यातच औषधीही देत. सध्याही ते दहा रुपयेच घेत. आयुष्यभर रुग्णसेवा करताना त्यांनी पैसा नाही तर असंख्य माणसं कमावली. पेशन्टला पुढं जाण्याचा सल्ला देताना गरजेनुरूप खिशात पैसैही घालत. मायेचा आधार देत, शब्दांचा धीर देत.

‘त्यांना’ भावना आवरता आल्या नाहीत

डॉ. खाबिया यांनी खामसवाडी येथील सेवायज्ञात आयुष्याची ४५ वर्षांची आहुती दिली. यानंतर राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रा. सुशील शेळके, तुरुंग अधिकारी रामराजे चांदणे यांनी गावात निरोप समारंभ आयोजित केला. या ठिकाणी तेरणाचे माजी संचालक त्र्यंबक शेळके, दिलीप पाटील यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांच्या कार्याला अनेकांनी उजाळा दिला. चार पिढ्यांचे डॉक्टर असलेल्या खाबिया यांच्या निरोपाप्रसंगी मने सुन्न झाली, काहींचे डोळे पाणावले.