शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाहन भरधाव दामटले, वाहनचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:34 IST

घरासमोर लावलेली दुचाकी झाली लंपास उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील शाहबाज जाफर कुरेशी यांनी त्यांच्याकडील एमएच २५ एएच ३६२० ...

घरासमोर लावलेली दुचाकी झाली लंपास

उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील शाहबाज जाफर कुरेशी यांनी त्यांच्याकडील एमएच २५ एएच ३६२० क्रमांकाची दुचाकी रविवारी (दि. २५) रात्री दत्तनगरातील आपल्या घरासमोर लावली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी ती लावलेल्या जागेवर आढळून आली नाही. शोध घेऊनही ती न सापडल्याने कुरेशी यांनी ढोकी ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

३३ ग्रॅम सोन्यासह मोबाईल नेले चोरून

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे घरफोडीची घटना सोमवारी (दि. २६) उघडकीस आली आहे. येथील सुमित गायकवाड यांचे घर बंद होते. या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर घरात ठेवण्यात आलेले ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच दोन मोबाईल या चाेरट्यांनी पळवून नेले. सोमवारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शिराढोण ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भांडणातून दोघांना कंबरपट्ट्याने मारहाण

उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या वादातून दोघांना सोमवारी (दि. २६) चिवरी येथे कंबरपट्ट्याने मारहाण झाली. सांगवी (मा.) येथील अनिल पवार व योगेश कोळी यांना नळदुर्ग येथील जरार कुरेशी व अनोळखी पाचजणांनी चिवरी येथे मारहाण केली. नंतर कारमध्ये बसवून अक्कलकोट रस्त्यावर नेत तेथेही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.