शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. मात्र, लसीचा पुरवठा कमी ...

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. मात्र, लसीचा पुरवठा कमी होत असल्याने माणसांचे लसीकरण लांबणीवर पडत आहे. त्यातच आता मे महिन्यात होणाऱ्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून घटसर्प, फऱ्या, आंतरविशार आदी लसीची मागणी शासनाकडे केली आहे. लस मिळाल्यानंतर जनावरांचे लसीकरण सुरू होणार आहे.

कोरोना संसर्गास प्रतिबंध बसावा, यासाठी १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. रुग्ण वाढू लागल्याने नागरिक स्वत:हून लस घेण्यास पुढे येत आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेस ब्रेक बसत आहे. काही मोजक्याच केंद्रावर लस दिली जात आहे, तर दुसरीकडे जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तोंडखुरी, पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना नोव्हेंबर व मे महिन्यात लसीकरण केेले जाते. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात पशुंचे सुरळीत लसीकरण झाले आहे. मे महिन्यात मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविली जात असते. मात्र, सध्या जिल्ह्यास लस प्राप्त न झाल्याने लसीकरण लटकले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून शासनाकडे लसीची मागणी केली आहे. लस प्राप्त होताच लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे, असे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील जनावरांची एकूण आकडेवारी

शेळ्या २०४३१३

मेंढ्या २०५६२

गाय वर्ग ३४६७७५

म्हैस वर्ग १७३१८५

कोणकोणत्या दिला जातात लस

गाय वर्ग म्हैस वर्गास घटसर्प लस दिली जात असते.

फऱ्या आजारास प्रतिबंध बसावा यासाठी गाय वर्ग व म्हैस वर्गास लस देण्यात येते.

शेळ्यांना आंतरविशार लसीकरण करण्यात येते.

कोंबड्यांना मानमोडी आजारापासून संरक्षण मिळावे यासाठी मानमोडी प्रतिबंधात्मक लस टोचली जात असते.

कोट...

जिल्ह्यात पशुंच्या मान्सूनपूर्व लसीकरणाची तयारी झाली आहे. शासनाकडे घटसर्प, फऱ्या, आंतरविशार लसीची मागणी केली आहे. लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ९५ पशुवैद्यकीय दवाखाने व राज्याचे ६ पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

डॉ. नामदेव आघाव,

पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद

नोव्हेंबरमध्ये पाच लाख पशुंना डोस

जिल्ह्यात तोंडखुरी व पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर व मे महिन्यात लस दिली जात असते. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ४ लाख ९६ हजार पशुंचे लसीकरण झाले होते.

पशुपालक चिंतेत

लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराचा फटका जनावरांना बसला. त्यातून पशुधन बचावले आहेत. पाळीव जनावरांच्या आजाराकडे पशुधन विभागाकडून उपाययोजना केलेल्या नाहीत. मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम राबवावी.

पांडुरंग सातपुते, पुशपालक, गोंधळवाडी.

दरवर्षी मे महिन्यात होणारे जनवारांचे लसीकरण अजून झाले नाही. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतलेली नाही. यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता अधिक आहे.

प्रदीप सुपेकर, पशुपालक, वारेवडगाव.