नगरपंचायतच्या स्थायी समिती व विषय समिती सभापती, सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्यासाठी नगरपंचायतच्या सभागृहात गुरुवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार डॉ.रोहन काळे यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष ज्योती मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वच विषय समितीच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले. त्यामुळे सभापतीपदांच्या निवडी या बिनविरोध झाल्या आहेत. यात अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी गगन माळवदकर तर सदस्य म्हणून आबुलवफा कादरी,श्याम नारायणकर, बाळासाहेब कोरे,सिमा लोखंडे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी कमल भरारे तर सदस्य म्हणून पौर्णिमा लांडगे,नाजमिन शेख, जयश्री कांबळे यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापतीपदी अभिमान खराडे तर सदस्य म्हणून श्याम नारायणकर,पाैर्णिमा लांडगे, आरीफ खानापुरे, बाळासाहेब कोरे यांची निवड झाली आहे. कर संकलन, विकास, नियोजन व शिक्षण समितीच्या सभापतीपदी प्रताप घोडके यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून बाळासाहेब कोरे,आयुब शेख,आरीफ खानापुरे,निर्मला स्वामी यांची निवड झाली. आरोग्य स्वच्छता व दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदी श्रीनिवास माळी तर सदस्य म्हणून पाैर्णिमा लांडगे, आरती गिरी, श्याम नारायणकर, आरीफ खानापुरे यांची निवड करण्यात आली. विषय समितीच्या निवडी बिनविरोध झाल्यानंतर नूतन सभापती, सदस्यांचा नगरपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लोहाऱ्यात बिनविरोध निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST