राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर भाषणात भाजपाच्या नेत्यांना झापड लगावण्याची भाषा केली. मात्र, त्यांच्यावर काेणतहीही कारवाई झाली नाही. परंतु, केंद्रिय मंत्मुरी राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेत केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्याविरूद्ध थेट गुन्हे नाेंदविण्यात आले. जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून हादरलेले राज्य सरकार एवढ्यावर थांबले नाही तर त्यांना काेणत्याही स्वरूपाची पूर्वकल्पना न देता अटकही केली. सरकारने ही कृती सर्व नियम पायदळी तुडवत केल्याचा आराेप करीत भाजपाच्या वतीने निषेध नाेंदविण्यात आला. तसेच वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरूद्धही गुन्हा नाेंदवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, तालुका सरचिटणीस अनिल बिराजदार, महिला तालुकाध्यक्ष सुलोचना वेदपाठक, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, श्रीकांत मणियार, जयवंत कुलकर्णी, पंकज मोरे, प्रदीप सांगवे,दिलीप गौतम, गुलाब डोंगरे, धर्मराज जाधव आदी उपस्थित होते.
उमरगा भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST