शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

स्त्री रूग्णालयात बारा महिन्यात पावणेदाेन हजार ‘सीझर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

उस्मानाबाद - महिला रूग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी स्वतंत्र स्त्री रूग्णालय सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांसह प्रसूतीची साेय ...

उस्मानाबाद - महिला रूग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी स्वतंत्र स्त्री रूग्णालय सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांसह प्रसूतीची साेय झाली. मागील जानेवारी ते डिसेंबर २०२० या बारा महिन्यात ६ हजार १०५ प्रसूती झाल्या. यापैकी पावणेदाेन हजार सीझर झाले. तर उर्वरित मातांची नाॅर्मल प्रसूती झाली. विशेष म्हणजे, वर्षभरात एकही मातामृत्यू झाला नाही. ही आराेग्य यंत्रणेचे मनाेबल उंचावणारी बाब मानली पाहिजे.

काही वर्षांपूर्वी जिल्हा रूग्णालयातच प्रसूती कक्ष हाेता. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत असे. आराेग्य यंत्रणेकडून करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे तसेच रूग्णवाहिकेच्या सुविधेमुळे रूग्णालयीन प्रसूतींकडे कल वाढला. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र स्त्री रूग्णालय उभारावे, अशी मागणी पुढे आली हाेती. त्यानुसार शासनाच्या मान्यतेनंतर हे रूग्णालय सुरू झाले. त्यामुळे जिल्हाभरातील प्राथमिक आराेग्य केद्र, उपकेंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयांतून रेफर केलेल्या गराेदर मातांना या ठिकाणी भरती करून घेतले जाते. अधिकाधिक महिलांची प्रसूती नाॅर्मल व्हावी, यावर रूग्णालयाचा भर असताे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या बारा महिन्यांत स्त्री रूग्णालयात तब्बल ६ हजार १०५ महिलांची प्रसूती झाली. यापैकी ४ हजार १९१ महिलांची प्रसूती नाॅर्मल झाली. तर उर्वरित १ हजार ९१४ महिलांचे सीझर करावे लागले. माता तसेच अर्भक मृत्यू हाेऊ नयेत, यासाठी रूग्णालयाकडून आवश्यक ती काळजी घेतली जाते. त्यामुळेच की काय, वर्षभरात एकही मातामृत्यू झालेला नाही. ही बाब रूग्णालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनाेबल उंचावणारी आहे.

चाैकट...

कुठल्या महिन्यात किती प्रसूती

महिना एकूण प्रसूती सीझर नाॅर्मल माता मृत्यू

जानेवारी ४२८ १५० २८८ ००

फेब्रुवारी ४२५ १२८ २९७ ००

मार्च ५६३ १२५ ३१९ ००

एप्रिल ३९८ १३८ २६० ००

मे ४८८ १६५ ३२३ ००

जून ४३६ १४२ २९४ ००

जुलै ४४२ १४४ ३१८ ००

ऑगस्ट ५५७ १५९ ४१३ ००

सप्टेंबर ६२५ १६८ ४५७ ००

ऑक्टाेबर ६४५ २०२ ४४३ ००

नाेव्हेंबर ६०४ १८६ ४१८ ००

डिसेंबर ५८६ २२५ ३६१ ००

डिसेंबरमध्ये सर्वाधिक सीझर

स्त्री रूग्णालयात नाॅर्मल प्रसूतींवर अधिक भर दिला जात असला तरी अपरिहार्य कारणांमुळे अनेकवेळा सीझर करावे लागते. त्यामुळे काही महिन्यात शंभर, काहीवेळा दीडशे तर कधी २०० सीझर झाले आहेत. मागील बारा महिन्यांत झालेल्या सीझरच्या संख्येवर नजर टाकली असता, डिसेंबर २०२० मध्ये सर्वाधिक २२५ सीझर झाले आहेत.

ग्राफ...

सीझर

१९१४

नाॅर्मल

४१९१

मातामृत्यू

०००

मातामृत्यूसाठी रक्तदाब ठरते सर्वात माेठे कारण

जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. स्त्री रूग्णालयात तर वर्षभरात एकही मातामृत्यू नाही. असे असले तरी जे काही मातामृत्यू हाेतात, त्यांच्यामध्ये सर्वात माेठे कारण रक्तदाब हे आहे. यासाेबतच काही मृत्यू रक्तक्षय, गर्भाशयाचा जंतूसंसर्ग यासारख्या कारणांमुळेही हाेतात, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.