शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त महिलांच्या मदतीला धावली तुळजाभवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : देव माणसातच आहे. देवत्वाची प्रचीती ही संकटसमयी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यातूनच येत असते. याचीच अनुभूती गुरुवारी तुळजाभवानी ...

उस्मानाबाद : देव माणसातच आहे. देवत्वाची प्रचीती ही संकटसमयी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यातूनच येत असते. याचीच अनुभूती गुरुवारी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने आणून दिली. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुराने हजारो कुटुंबे उघड्यावर आलेली असताना लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडत तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सुमारे २५ हजार साड्या पूरग्रस्त भगिनींसाठी पाठविण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील पुराने हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यांचे भरून न येणारे आर्थिक, मानसिक नुकसान झाले. अशा नागरिकांच्या मदतीला सरकारसोबतच सर्वसामान्यही जमेल ती मदत घेऊन धावून जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक संस्था, संघटनांनी आपापल्या परीने अन्नधान्य, चादरी, कपडे अशी मदत पाठविली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना तर आवाहन केलेच, शिवाय तुळजाभवानीलाही साकडे घातले. यानंतर लागलीच मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेत विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी व अन्य सदस्यांशी चर्चा करून मंदिराच्या वतीने देवीला अर्पण करण्यात आलेल्या नव्या साड्या पूरग्रस्त भगिनींसाठी पाठविण्याबाबत चर्चा केली. कोणतेही आढेवेढे न घेता विश्वस्तांनी या निर्णयास सकारात्मकता दर्शविल्याने तब्बल २५ हजार साड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पाठविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

या साड्यांचा होतो लिलाव...

तुळजाभवानी देवीला भाविकांकडून सहावार व नऊवार साड्या वाहिल्या जातात. १० ऑगस्टपर्यंत मंदिर समितीकडे वाहिलेल्या साड्यांचा सुमारे २५ हजार स्टॉक आहे. यात १ हजार नऊवार, तर २४ हजार सहावार साड्या आहेत. नियमानुसार या साड्यांचा दरवर्षी लिलाव होत असतो. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळत असते. मात्र, यावेळी मदत म्हणून या साड्या पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे. लवकरच या साड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात येणार आहेत.