शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील ७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : शासनाचे आदेश आल्यानंतर साेमवार व मंगळवार असे दाेन दिवस पात्र कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय कारणांवरून विविध विभागातील ...

उस्मानाबाद : शासनाचे आदेश आल्यानंतर साेमवार व मंगळवार असे दाेन दिवस पात्र कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय कारणांवरून विविध विभागातील ७९ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक २६ बदल्यांचा समावेश आहे.

राज्य शासनाकडून बदल्यांना हिरवा कंदील मिळताच सामान्य प्रशासन विभागाकडून नियाेजन करण्यात आले. सीईओ राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार साेमवार व मंगळवार हे दाेन दिवस बदली प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आले हाेते. बदली प्रक्रिया पारदर्शक वातावरणात व्हावी, म्हणून समुपदेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच साेमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता हे काेराेनाच्या मिटिंगमध्ये अडकून पडल्याने प्रक्रिया काही काळ विलंबाने सुरू झाली हाेती. रात्री साडेआठ वाजता संबंधित विभागाच्या बदल्या झाल्यानंतरच त्यांनी दालन साेडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे, बुधवारी निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पार पडली. उपराेक्त दाेन दिवसांत जवळपास ७९ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बांधकाम विभागातील ३, आराेग्य १४, महिला व बालकल्याण १, पशुसंवर्धन ८, कृषी १, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग १, ग्रामपंचायत विभाग १८, वित्त विभाग ३, शिक्षण विभाग ४, तर सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक २६ बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे निर्देश सीईओ गुप्ता यांनी दिले आहेत.