शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकेका मतांसाठी टफ फाईट; ‘आयसीयू’तील मतदार ॲम्ब्युलन्समधून थेट मतदान केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 19:05 IST

सरळसरळ लढत होत असल्याने दोन्ही बाजूने काही मतदारांना ‘सहल’ घडवली होती, तर काही मतदार वैयक्तिक अडचणी सांगत घरीच थांबले होते

कळंब (जि. उस्मानाबाद) -जिल्हा बँक निवडणुकीचा एकतर्फी वाटणारा सामना अंतिम टप्प्यात मात्र भलताच ‘टफ मॅच’ ठरला आहे. एकेका मतासाठी सर्व मार्गाने प्रयत्न झाले. यातच सौंदना अंबा येथील एका अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्ण मतदाराने थेट कार्डियाक ॲम्ब्युलन्स मतदान केंद्र गाठले अन् आपला मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा सामना रंगला होता. कळंब तालुक्याचा विचार केला तर यास भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील विरूद्ध महाविकास आघाडी असेच चित्र दिसून येत होते. यामुळेच सोसायटी मतदारसंघातील ७० व इतर संस्था मतदारसंघातील ६० अशा एकूण १३० मतदारांना चांगलाच भाव आला होता. यात सरळसरळ लढत होत असल्याने दोन्ही बाजूने काही मतदारांना ‘सहल’ घडवली होती, तर काही मतदार वैयक्तिक अडचणी सांगत घरीच थांबले होते. या स्थितीत रविवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दुपारच्या सुमारास महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा हा सामना एकतर्फी न होता बिग फाईट असल्याचे दिसले. यामुळे मतदान केंद्रांकडे येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या संदर्भात ‘क्लायमॅक्स’ वाढत होता. यातच अचानक एक सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स मतदान केंद्र असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात दाखल झाली. यामध्ये कोण होते? तर सौंदना अंबा (ता. कळंब) येथील सोसायटी मतदारसंघातील मतदार होते.

आयसीयूमधून आले, पण मतदान केलेच...सौंदना, लासरा व वाकडी (इस्थळ ) या तीन गावची ग्रुप सोसायटी आहे. या संस्थेचा बँक निवडणुकीसाठी मधुकर भाऊराव पालकर यांच्या नावे ठराव होता. मात्र, निवडणुकीच्या ऐन धामधुमीत त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. यानंतर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या स्थितीत त्यांनी रविवारी दुपारी ॲम्ब्युलन्समधून कळंब गाठले अन् मतदान केले.

मतदान केंद्र अधिकारी रुग्णवाहिकेत पोहोचले..बँक निवडणुकीत मतदानासाठी थेट ॲम्ब्युलन्सने कळंब येथील मतदार केंद्रावर दाखल झाल्यानंतर मतदान केंद्र अधिकारी, सहायक मतदान अधिकारी अशा कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी इमारतीमधून खाली येत ॲम्ब्युलन्स गाठली. याठिकाणी त्यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे पालकर यांना मतदानाचा हक्क बजावता आला.

टॅग्स :VotingमतदानOsmanabadउस्मानाबाद