शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

यंदा 'विघ्न'हर्ताच आला..! वाजत नाही तर गाजत आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : गेली दोन वर्षे जिल्ह्यावर अतिवृष्टी अन् कोरोनाच्या विघ्नाने कहर केला. त्यात सण-उत्सवही भरडले गेले. आता कोरोनाचे विघ्न ...

उस्मानाबाद : गेली दोन वर्षे जिल्ह्यावर अतिवृष्टी अन् कोरोनाच्या विघ्नाने कहर केला. त्यात सण-उत्सवही भरडले गेले. आता कोरोनाचे विघ्न काहीअंशी कमी झाल्याने निर्बंधात का होईना बाप्पांचा उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याचा उत्साह शुक्रवारी उस्मानाबादेत पहायला मिळाला. तोंडावर मास्क लावून बाळगोपाळांचा जत्था बाजारपेठेत बाप्पांना घरी नेण्यासाठी आतूर असलेला दिसला. यंदा मिरवणुकीला परवानगी नव्हती. त्यामुळे वाजत का नसेना, पण गाजत बाप्पा घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झाले.

गणेशस्थापनेच्या निमित्ताने गुरुवारी सायंकाळपासूनच बाजारपेठेत मोठी लगबग दिसून येत होती. मूर्ती विक्रीसाठी स्टॉल सजविण्यात येत होते. सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली होती. बाप्पाच्या उत्सवाचा माहोल तयार झाला होता. शुक्रवारी सकाळ उजडताच अगदी ७ वाजेपासून रस्त्यांवर गर्दी होताना दिसून आली. एरवी मॉर्निंग वॉकर्सनी फुलणारे रस्ते शुक्रवारी बाळगोपाळ अन् ज्येष्ठ नागरिकांनी भरलेले दिसले. मूर्ती तसेच सजावटीचे व पुजेचे साहित्य साहित्य आणण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, राजमाता जिजाऊ चौक, सांजा नाका, ज्ञानेश्वर मंदिर भागात गणेशभक्तांची लगबग वाढली होती. सकाळी ९ वाजेनंतर मात्र बाजारात मोठी गर्दी उसळली. सुरक्षित अंतराचा नियम पाळला गेला नाही. मात्र, यातील अनेकांनी मास्कचा वापर केलेला दिसून आला.

मूर्ती लहान, किंमत महान...

यंदा सार्वजनिक मंडळांनाही ४ फुट उंचीच्या मूर्तीचे बंधन असल्याने बाजारात यापेक्षा मोठ्या मूर्ती दिसून आल्या नाहीत. दरवर्षीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापरही मूर्तीसाठी कमी झाल्याचे दिसले. मर्यादित उंचीमुळे मूर्तीकारांनी लहानच पण अतिशय मेहनत घेऊन सुबक मूर्ती तयार केल्या होत्या. त्यामुळे स्वाभाविकच किमतीही वाढल्या. अर्धा फूट ते ४ फूट उंचीच्या मूर्ती बाजारात होत्या. त्यांची किमत १०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत होती. गतवर्षीच्या तुलनेत दर दीडपट अधिक होते.

बाजारपेठ फुलली...

जवळपास दीड वर्षानंतर बाजारपेठेत एखाद्या उत्सवाचा इतका उत्साह पहिल्यांदा पाहायला मिळाला. गणरायांच्या पूजेसाठी लागणा-या दुर्वा, मका विविध प्रकारची फळे, फूले, पुष्पहार, मखर, पाटे, रांगोळी, रंगीत दिव्यांच्या माळा यासह विविध प्रकारच्या सजवटीच्या साहित्यांनी अन् त्यांच्या खरेदीसाठी दुकाने गजबजली होती. तसेच गणरायांच्या नैवेद्यासाठी मिठाई दुकानातही चांगलीच गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.