शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी जागाही पडतेय अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST

उमरगा : शहर व तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही अपुरी पडत असल्याचे ...

उमरगा

: शहर व तालुक्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा जागा नसल्याने शवदाहिनी सोडून स्मशानभूमीतील मोकळ्या जागेत सरण रचून अंत्यविधी करण्याची वेळ पालिका कर्मचाऱ्यांवर येत आहे. गेल्या पंधरा दिवसात उमरगा शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६८ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

उमरगा शहरात कोरोना अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. शिवाय, मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवसाला किमान सात ते आठ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. शहरातील सरकारी कोविड रुग्णालयाबरोबरच पाच खासगी कोविड रुग्णालयातही कोरोना रुग्ण भरती केले जात आहेत. सध्या ४३५ कोरोना रुग्णावर उपचार चालू असून, याचबरोबर मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रात्रंदिवस अंत्यसंस्काराचे काम पालिका कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. गेल्या महिनाभरात कोरोनामुळे ८० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ६८ जणांचा मृत्यू गेल्या पंधरा दिवसात झालेला आहे. दिवसाला किमान सात ते आठ जणांवर येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. यासाठी पालिकेची पाच जणांचे पथक कार्यरत आहे.

विद्युत शवदाहिनीची गरज

एक अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी किमान ५०० किलो लाकूड लागते. दिवसभरात सरासरी सात ते आठ मृतांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. पालिका प्रशासन यासाठी शहरातील लाकडी अड्ड्यातून लाकडाची व्यवस्था करीत आहे. परंतु, कोरोनाचे हे संकट पाहता पालिका प्रशासनाने स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी बसविण्याची गरज व्यक्त कली जात आहे.