शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील ...

उस्मानाबाद - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाेरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे घरफाेडी, उस्मानाबादेत ऑनलाईन सर्व्हिस सेंटर तर कळंब बसस्थानकातून प्रवाशाचा माेबाईल अज्ञाताने लंपास केला. या सर्व घटना १७ ते १८ ऑगस्ट या कालावधीत घडल्या आहेत.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील सुहास छबु गुंड हे १८ ऑगस्टला शेतात केले हाेते. हीच संधी साधत अज्ञात चाेरट्यांनी घराच्या दरवाजावरील कुलूप ताेडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील ३३ ग्रॅम साेन्याचे दागिने, १० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण व राेख ३५ हजार रुपये लंपास केले. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर सुहास गुंड यांनी १८ ऑगस्टला तामलवाउी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञाताविरुद गुन्हा दाखल झाला. दुसरी घटना उस्मानाबाद शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात घडली. कार्यालयासमाेरील मैत्री ऑनलाईन सर्व्हिस सेंटरचा पत्र उचकटून अज्ञाताने आतील संगणक व राेख १५ हजार रूपये लंपास केले. चाेरीची ही घटना समाेर आल्यानंतर महेबूब शेख (रा. उपळा मा.) यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करयातआला आहे. तिसरी घटना उमरगा तालुक्यातील नाईकनगर शिवारात घडली. विशाल मालपाणी यांनी शेतातील शिवारात शेड उभारले हाेते. याच ठिकाणी त्यांनी दाेन बैल बांधले हाेते. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने दाेन्ही बैल लंपास केले. ही घटना समाेर आल्यानंतर शेतकरी राम चव्हाण यांनी मुरूम पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चाैकट...

प्रवाशाचा माेबाईल लांबविला...

पुणे येथील रहिवासी नवीर काझी हे १८ ऑगस्ट राेजी कळंब बसस्थानकातील फलाट क्र. १ वर थांबले हाेते. बस दाखल हाेताच ते आत प्रवेश करत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या खिशातील स्मार्टफाेन लंपास केला. या प्रकरणी काझी यांचा भाचा इस्तियाक काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंसंचे कलम ३७९ अंतर्गत कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करत आहेत.