शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

बालाजी आडसूळ कळंब : अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या ‘तालिबानी’ वर्चस्वाचा प्रतिकूल परिणाम होऊन ‘सुकामेवा’ चांगलाच महागला असून, मागच्या पाच दिवसात ...

बालाजी आडसूळ

कळंब : अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या ‘तालिबानी’ वर्चस्वाचा प्रतिकूल परिणाम होऊन ‘सुकामेवा’ चांगलाच महागला असून, मागच्या पाच दिवसात सर्रास मागणी असलेला बदामाचा दर सहाशे रूपये किलोवरून हजारी पार करून गेला आहे.

अलिकडे लाईफस्टाईल अन् यामुळे खाद्यसंस्कृती बदलली आहे. श्रीमंतीच्या खुणा दर्शवणारा ‘सुकामेवा’ मध्यमवर्गीयांच्या घरात दिसून येत आहे. मागच्या दशकभरात मागणी वाढलेल्या ड्राय फ्रूटसमधील अंजीर, बदाम, मनुके, काजू, पिस्ता, अक्रोड, शहाजीरे यासह अगदी लज्जतदार ‘टेस्टींग पावडर’ ही प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आयात होते. मात्र, मागच्या आठवडाभरात तेथे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका भारतीय ड्राय फ्रूट बाजाराला बसला असून सुक्यामेव्यातील अनेक वस्तूंचा दर ३० ते ४० टक्क्यांनी वधारला आहे.

बॉक्स 1

मागणी कायम, पण ‘स्टॉक’ जेमतेम....

कळंब शहरात ड्राय फ्रूट मार्केट चांगले आहे. बाजारात ठोक, किरकोळ विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडील साठ्यांची एकत्रित माहिती मिळू शकली नसली तरी काही व्यापाऱ्यांनी मागणी कायम आहे, मात्र आमच्याकडे जेमतेम स्टॉक आहे. यामुळे तालिबान संकटाचा येणाऱ्या काळात परिणाम अधिक जाणवणार असल्याचे सांगितले.

बॉक्स 2

दर पूर्ववत होण्याची गरज...

प्रतिक्रिया

कळंब शहरात ड्राय फ्रूटसची मोठी मागणी आहे. परंतु, अचानक झालेली दरवाढ ग्राहकांना झळ देणारी आहे. सहाशे रुपये किलोचा बदाम हजाराच्या पुढे गेला आहे. यामुळे भाव विचारून ग्राहक थांबत आहे. खरेदी टाळत आहे.

- गजानान जाधव, ड्रायफ्रूट विक्रेते, कळंब

बदाम, अंजीर, काजू, मनुके, पिस्ता यांची मागणी जास्त असते. मात्र, दरवृद्धी झाल्याने खरेदी व विक्री यावर परिणाम होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडेल असा दर असेल तर उलाढाल वाढते. यामुळे दर पूर्ववत होण्याची गरज आहे.

- हारून दारूवाले, ड्रायफ्रूट विक्रेते, कळंब

भाव फलक...

ड्राय फ्रूट तणावापूर्वी तणावानंतर

बदाम ६०० १२००

अंजीर ९०० १२००

अक्रोड ८०० १०००

लिंबूसत्व १०० १६०