शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिर परिसरातील उपदेवी, देवतांची मंदिरेही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 19:38 IST

श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात असलेले अन्नपूर्णादेवी मंदिर, टोळभैरव मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती (मातंगीदेवी) मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले होते.

ठळक मुद्देकेवळ कुलधर्म-कुलाचारसाठी उघडणार दरवाजेतोंडी सूचना देऊनही मंदिरांत भाविकांची गर्दी होऊ लागली होती

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी प्रशासनाने नियम अटी लादून बंद केले असून, ते अद्यापही बंदच आहे. मात्र, भाविक मंदिर परिसरात असलेल्या उपदेवी देवतांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. यातून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी गुरुवारपासून महाराष्ट्र शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सदरील तिन्ही उपदेवी-देवतांची मंदिरे भाविकांसाठी बंद केली असून, त्याच्या चाव्या मंदिर प्रशासनाकडे देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. त्यामुळे भाविक तुळजाभवानी देवीच्या महाद्वारावरच माथा टेकून दर्शन घेतात. मात्र, श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात असलेले अन्नपूर्णादेवी मंदिर, टोळभैरव मंदिर आणि आदिमाया आदिशक्ती (मातंगीदेवी) मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले होते. तोंडी सूचना देऊनही मंदिरांत भाविकांची गर्दी होऊन लागल्याने, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होऊन मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता होती. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी भाविकांसाठी मंदिरे कुलूपबंद केली आहेत. त्याच्या चाव्या मंदिर प्रशासनाकडे ठेवण्यात आल्या असून, दैनंदिन कुलधर्म कुलाचारासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या पाळीकर पुजारी व सेवेकरी यांची मंदिरातील रजिस्टरला नोंद घेऊन चावी सेक्युरिटीसोबत देऊन मंदिर उघडून पूजा-आरती करून पुन्हा मंदिर बंद करण्यात येत आहे.

पुजारी, व्यापाऱ्यांना दरमहा मदत द्यावीएक पाळीकर पुजारी व एक सेवेकरी यांना मंदिरात प्रवेश देण्यात येत असून, मंदिरातील पूजा-आरती होईपर्यंत मंदिराची चावी देण्यात येते. पूजा-आरती झाल्यानंतर पुन्हा मंदिराला कुलूप लावून चावी मंदिर प्रशासन कार्यालयात जमा करावी लागते. या मंदिरावर शेकडो कुटुंबांची उपजीविका चालते. मंदिर बंद असल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिर बंद ठेवायचे असेल तर येथील पुजारी, व्यापारी यांना महिन्याकाठी मदत देण्यात यावी, अशी मागणी आदिमाया आदिशक्ती (मातंगी देवी) पाळीकर पुजारी यांनी केली आहे.

कोरोना नियमांचे पालन गरजेचे कोरोना अजूनही पूर्णत: आटोक्यात नाही. महाराष्ट्र शासनाने जे नियम दिलेले आहेत, त्याचे पालन गरजेचे आहे. बंद केलेल्या मंदिरातील कुलधर्म, कुलाचार सुरू राहतील. धार्मिक विधीसाठी कुठलीही अडचण नाही. मात्र, तेथे भाविक येऊ लागल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता होती. त्याअनुषंगाने तीन मंदिरे सील केली असून, पुजाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.- सौदागर तांदळे, तहसीलदार