शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींच्या प्रयत्नातून शिष्यवृती परीक्षेत ‘तडवळा पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

नूर शेख कसबे तडवळे (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक कन्याशाळेने मागील काही ...

नूर शेख

कसबे तडवळे (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक कन्याशाळेने मागील काही वर्षांत विशेषत: शिष्यवृत्ती परीक्षेत ‘तडवळा पॅटर्न’ निर्माण केला आहे. बाराही महिने चालणारी शाळा म्हणून या शाळेचा परिसरात नव्हे तर जिल्हाभरात नावलाैकिक झाला. मुख्याध्यापक रहेमान मकबूल सय्यद व सहकारी शिक्षकांची मेहनत, पालक अन् ग्रामस्थांच्या एकी यातून हे साध्य झाले. यापुढेही शाळेची घाेडदाैड अशीच कायम राहील, असा ठाम विश्वास मुख्याध्यापक सय्यद यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला.

कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक कन्याशाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक रहेमान मकबूल सय्यद हे १ जुलै १९८९ रोजी शिक्षक म्हणून ताडगाव (ता. कळंब) येथे रुजू झाले. २०१६ मध्ये रहेमान सय्यद यांची आपल्या गावी कसबे तडवळे येथे बदली झाली. ग्रामीण भागातील मुलांतही गुणवत्ता असते. त्यांच्या गुणवत्तेला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जाेड मिळाली की, ही मुलेही मागे राहणार नाहीत, असा त्यांना विश्वास हाेता. यातूनच त्यांनी सहकारी गुरुजींना साेबत घेऊन नवाेदय, तसेच अन्य शालेय स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यास सुरुवात केली. सुटी असली तरी मुख्याध्यापक सय्यद यांच्यासह शिक्षक शाळेत येतात. त्यामुळे बाराही महिने चालणारी शाळा म्हणून या शाळेचा नावलाैकिक निर्माण झाला. आजघडीला शाळेतील १०८ मुली नवाेदयधारक, तर ५९ मुली शिष्यवृत्तीधारक बनल्या.

गुणवत्ता वाढीसाेबतच मुख्याध्यापक सय्यद यांनी शाळेत भाैतिक सुविधा वाढविण्यावरही भर दिला. लोकसहभाग व लोकवाट्यातून आज रोजीपर्यंत शाळेत १५ स्मार्ट टीव्ही, १५ सॅमसंग टॅब, एक इंटरॅक्टिवे बोर्ड, संपूर्ण शाळा परिसर सीसीटीव्ही कॅमेरा, ई लर्निंग, शिक्षक व पालकांच्या सहकार्याने तब्बल दीड लाख रुपयांचे सुसज्ज वाचनालय, पंधरा लाखांची नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा, १४ वर्गखोल्या डिजिटल व शैक्षणिक साहित्याने सुसुज्ज, पंधरा लाखांची नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा व शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रतितास १०० लीटर क्षमतेचे वॉटर फिल्टर, सहा संगणक असलेली सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, आकाश निरीक्षण दुर्बिणीयुक्त मेट्रोमनी क्लब, शाळेच्या पाठीमागील बाजूस सुंदर अशी परसबाग निर्मिती केली. त्यामुळे एकीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा पट कमी हाेत असताना तडवळ्याच्या शाळेचा पट पाचशेच्या आसपास पाेहाेचला आहे.