शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालय, ट्राॅमा केअरला पुन्हा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST

कळंब : उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतरण व ट्राॅमा केअर हॉस्पिटलचा प्रश्न शासन ...

कळंब : उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतरण व ट्राॅमा केअर हॉस्पिटलचा प्रश्न शासन दरबारी निकाली निघेल, ही कळंबकरांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे या सुविधेसाठी कळंबकरांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जातो आहे.

कळंब ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्यानंतर नगर परिषदेने अधिक सुविधांसाठी या रुग्णालयाशेजारील जवळपास दीड एकर जागा रुग्णालयाला दिली. या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून मंत्रालयात मंजुरीअभावी पडून आहे. त्यामुळे कळंब रुग्णालयाची अवस्था ‘नाव सोनुबाई...’ या म्हणीप्रमाणे झाली आहे. रुग्णालयाला उपजिल्हा हा दर्जा मिळाल्याने याठिकाणी विविध वैद्यकीय सोयी सुविधा मिळतील, अशी कळंब शहर व शेजारील बीड, लातूर जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा होती. त्यामुळे खासगी दवाखान्यातील खर्चिक उपचारांना आळा बसेल, अशीही भावना होती. परंतु, रुग्णालयात आल्यावर फक्त नाव बदलले, व्यवस्था नाही, असा अनुभव रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येत आहे.

कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या जागा हस्तांतरणासाठी तत्कालिन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मंत्रालय स्तरावर अनेकदा पत्र देऊन पाठपुरावा केला. विद्यमान आमदार कैलास पाटील यांनीही याविषयी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दरबारात मांडला होता. असा सर्वपक्षीय रेटा असतानाही उपजिल्हा रुग्णालयाची फाईल कोठे चिटकून बसली आहे? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

चौकट -

स्थगिती झटक्यात, हस्तांतरण बासनात!

कळंब नगर परिषदेमधील विकासकामांवर स्थगिती आणण्याची व हटविण्याची मंत्रालयातील फाईल वेगाने फिरली. तसा रेटाही दोन्हीही बाजूने लावण्यात आला होता. दोन्ही पक्षांनी व स्थानिक नेत्यांनी तो प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व ट्राॅमा केअरचा प्रश्न तसाच प्रतिष्ठेचा करून सर्वपक्षीय मंडळींनी ही फाईलही त्याच वेगात पळवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.

चौकट -

विकासाचे राजकारण अपेक्षित

कळंब तालुक्यातील राजकारणाची सुत्रे आता जिल्ह्याबाहेरून हालत आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीचे निर्णय उमरगा येथून, तर सेना - भाजपची सुत्रे उस्मानाबाद येथून हलविली जात आहेत. त्यामुळे कळंबचा आवाज शासनदरबारी थेट जाण्याऐवजी उमरगा किंवा उस्मानाबादमार्गे जातो आहे. तो जातो की नाही, याचीही खात्री स्थानिक नेत्यांना नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून राजकारण करताना ते विकासासाठी करा, अशी अपेक्षाही कळंबकरातून व्यक्त होते आहे.