पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून गेलेल्या औरंगाबाद - सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग ५१ रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गैरसोयी आहेत. त्यामुळे ही कामे तत्काळ मार्गी लावून गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रकल्प उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रकल्प संचालक काळे यांच्या वतीने एन.एच.आय.च्या प्रकल्प उपसंचालक पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी उपसरपंच व सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांनी पारगाव मधील नागरिकांच्या अडचणी समजावून सांगितल्या. यात प्रामुख्याने पारगावात प्रवेश करताना दोन्ही बाजू (दक्षिण - उत्तर) हायमास्ट बसविणे, बायपाससाठी स्ट्रीट लाईट बसविणे, जुना रस्ता साफ करून देणे, आडबांध रस्त्याच्या ठिकाणी हायमास्ट बसविणे, पारगाव ते भीमाशंकर साखर कारखाना सर्व्हिस रोड करणे, गावातील रस्ता व रस्त्यालगतच्या नाल्या बांधकाम करणे आदी मागण्या त्यांनी मांडल्या. यावर लागलीच सेफ्टी डिपार्टमेंटचे पवार यांना पारगाव येथे भेट देण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या. तसेच गावातील नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. साखर कारखाना व गावात प्रवेश करण्यासाठी नवीन पुलाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे व त्याची एक प्रत ग्रामपंचायत कार्यालयास देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
030721\img-20210703-wa0004.jpg
निवेदन