शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरचाैकात उभे राहून अश्लील भाषेत शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

कळंब - शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी मध्यरात्री फेसबुक लाईव्ह करून अश्लील भाषेत वैयक्तिक नाव घेऊन शिवीगाळ केली. ...

कळंब - शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी मध्यरात्री फेसबुक लाईव्ह करून अश्लील भाषेत वैयक्तिक नाव घेऊन शिवीगाळ केली. तसेच राज्यातील १४८ आमदारांचा उल्लेख करून त्यांच्याविषयी अपमानस्पद वक्तव्य केले, अशी तक्रार कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी कळंब पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून शहरातील एका युवकावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, शहरातील आकाश भागवत चोंदे याने २३ मेच्या मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे राहून स्वतःच्या फेसबुक पेजवर त्याचे लाईव्ह चित्रण केले. त्या व्हिडिओमध्ये आपल्याविषयी अत्यंत अश्लील व अश्लाघ्य भाषा वापरली.

माझ्या जातीचा एकेरी उल्लेख करीत जातीय निर्भत्सना केली. राज्यातील विशिष्ट १४८ आमदारांचा उल्लेख करून त्यांच्याविषयीही अत्यंत हीन भाषा वापरली. ‘रस्त्याच्या कामात पैसे खाल्ले’, असे म्हणून बदनामी केली. हा सर्व प्रकार महिला पदाधिकाऱ्यावर अन्याय करणारा, जातीय तेढ निर्माण करणारा, सार्वजनिक शांततेचा भंग करणारा, राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्यासमोर बिभत्स वर्तन करून त्यांचा अवमान करणारा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून आकाश भागवत चोंदे (रा. आथर्डी रोड, कळंब ) याच्याविरोधात भादंवि कलम ३५४ अ,१५३ अ, २९४, ५०४ व आयटी ॲक्ट ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट

राजकीय व्देषातून व्हिडिओद्वारे बदनामी -मुंड

मागील वर्षी काही कामाच्या शिफारसी मजूर फेडरेशनसाठी तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दाेन ते तीन शिफारसी आम्हाला द्या, म्हणून नगरसेविका मीरा चोंदे यांचा मुलगा आकाश चोंदे याने आम्हा पती-पत्नीकडे वारंवार मागणी केली. परंतु पालिकेच्या स्वनिधीतील तूट पाहता तत्कालीन मुख्याधिकारी यांनी त्या शिफारशी स्थगित ठेवल्या. परिणामी ती कामे होऊ शकली नाहीत. त्याचा राग व त्याला इतरांची राजकीय द्वेषातून मिळणारी फूस यातून चोंदे याने तो व्हिडिओ टाकला. हा प्रकार समाेर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी संबंधितावर कडक कार्यवाही व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महिला आयोगाच्या रेखा शर्मा, यशोमती ठाकूर यांच्याकडेही दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.