शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून काेरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता ...

उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून काेरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. नागरिकांनी घरात बसणे पसंत केल्याने बाजारपेठेतील रस्ते ओस पडले होते; मात्र मुख्य रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कायम होती. जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. तसेच या काळात संचारबंदीही लागू केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी शहरात फिरुन दुकाने न उघडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. तर नागरिकांनीही घरातच बसणे पसंत केले. त्यामुळे सकाळपासून शहरातील राजमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरु चौक परिसरातील दुकानांचे शटर डाऊन होते. त्याचबरोबर शहरातील मुख्यरस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत होता. या कर्फ्यूमधून दवाखाने, औषधी दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. मात्र शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसभरात वाहनधारकांची वर्दळ पाहावयास मिळाली.

सलग दुसऱ्या मार्चमध्ये बंद

गेल्यावर्षी मार्च महिन्यात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी जनता कर्फ्यूनंतर आता पुन्हा यंदाच्या मार्च महिन्यातही उस्मानाबादेत जनता कर्फ्यू जाहीर झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी लग्नसराई, धान्य खरेदीच्या काळात उस्मानाबादेत कडकडीत बंद पाहावयास मिळाला.

बसस्थानकातही गर्दी कमी

जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठ बंद असल्यामुळे नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले. त्यामुळे बसस्थानकातही गर्दी कमीच होती. स्थानकातून प्रवाशांच्या संख्येनुसार बस सोडण्यात येत होत्या.