लोहारा : येथील ग्रामीण रुग्णालयाला युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी दोन स्पिकर संच आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भेट दिले. या रुग्णालयांतर्गत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व आयटीआय कॉलेज अशी दोन कोविड सेंटर उभारण्यात आली असून, त्याठिकाणी १५०पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत. येथील रुग्णांशी संवाद साधणे सुलभ व्हावे, यासाठी युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी या दोन्ही कोविड सेंटरसाठी दोन स्पीकर संच भेट दिले. तसेच शहरातील नऊ आशा कार्यकर्तींना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्री, वाफेची मशीन, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, शहरप्रमुख सलीम शेख, जगदीश लांडगे, नामदेव लोभे, श्रीकांत भरारे, सुधीर घोडके, अमिन सुंबेकर, महेबूब गवंडी, भरत सुतार, शहाजी जाधव, दत्ता मोरे, प्रेम लांडगे, आदी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयाला स्पिकर सेट भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST