शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST

भूम : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता ...

भूम : ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी सर्वपक्षीय फॉम्युर्ला चालला. येथील परंडा रोडवरील अनुसूचित जाती मुलांची निवासी आश्रमशाळेत सकाळी २७ टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला. एका फेरीचा निकाल जाहीर होण्यासाठी एक तासाचा कालावधी लागत होता. निकाल बाहेर पडताच समर्थकांकडून गुलालाची उधळण, घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला जात होता. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती म्हणून वालवड, ईट, माणकेश्वर, पाथरुड या ग्रामपंचायतकडे पाहिल जाते. यातील वालवड येथे राष्ट्रवादी-भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय श्री वाल्मीकेश्वर ग्रामविकास पॅनलने ११ जागांवर यश मिळविले असून, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता मोहिते यांची पिछेहाट झाली आसल्याने येथे सत्तांतर झाले. माणकेश्वर येथे जिल्हा परिषद सदस्य शिवसेना स्व. बाबूसाहेब अंधारे यांच्या जनविकास अघाडी पॅनलने १२ जागांवर यश मिळवित ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात घेतली. पाथरुड येथे महाविकास अघाडी पुरस्कृत पॅनलचे १० उमेदवार विजयी झाल्याने येथेही सत्ता बदल झाला असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या आरसोली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार राहुल मोटे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे संजय पाटील यांच्या पॅनलला यश मिळाले. त्यामुळे येथेही सत्तेच्या विरोधात मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिंचपूर ढगे येथे माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांचे समर्थक विशाल ढगे यांनी वर्चस्व कायम राखण्यात यश मिळिवले. शिवसेनेचे पंचायत समिती उपसभापती बालाजी गुंजाळ यांच्या वांगी (बु) गावात त्यांच्याच पॅनलचा पराभव झाला असून, येथे राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य अदिनाथ पालके यांच्या नेतृत्वाखालील ह. भ. प. धोडोपंत दादा महाराज पॅनलने बाजी मारली. नळी वडगाव ग्रामपंचायतीवर वंचित आघाडीचे प्रवीण रणबागूल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ताबा मिळवला. रामेश्वर येथे संत भगवानबाबा परिवर्तन पॅनलने सर्व सातही जागांवर विजय मिळिवला असून, येथे शिवसेना महिला अघाडी तालुकाध्यक्ष अर्चना दराडे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. आष्टा येथे राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामविकास अघाडीला यश मिळाले असून, येथेही सत्तांतर झाले आहे.