शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

शिवसेना खासदाराच्या तक्रारीवरुन स्वपक्षीय उमेदवारावरच गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 19:16 IST

व्हीडिओद्वारे बदनामी केल्याचे प्रकरण

उमरगा (उस्मानाबाद) : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (महायुती) उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी व्हीडिओद्वारे बदनामी केल्याची तक्रार त्यांच्याच पक्षाचे खासदार रवी गायकवाड यांनी केली आहे़ याप्रकरणी उमरगा ठाण्यात मंगळवारी उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

निवडणूक लागल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांचा एक व्हीडिओ मतदारसंघात चांगलाच व्हायरल झाला होता़ यामध्ये ते खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांच्या नावाने शिवीगाळ करीत असल्याचे दिसत होते़ सोशल मिडीयात हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार रवी गायकवाड यांनी मंगळवारी उमरगा पोलीस ठाणे गाठले़ त्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे़ त्यात राजेनिंबाळकर यांनी व्हीडिओद्वारे आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत़ शिवीगाळ करुन आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे़ हा व्हीडिओ सोशल मीडियात प्रसारित झाल्याने आपली बदनामी झाल्याचे म्हटले आहे

या तक्रारीनुसार उमरगा पोलिसांनी ओम राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६५, ६६, ६७ व भादंविच्या ५००, ५०१, ५०२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतर रवी गायकवाड हे दुपारी उस्मानाबादेत दाखल झाले होते़ त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दिली़ मात्र, या विषयावर बोलण्यास टाळले़ दरम्यान, ओम राजनिंबाळकर यांनी ४ एप्रिल रोजी ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर ढोकी पोलिसांकडे तक्रार दिली होती़ हा व्हीडिओ आपली बदनामी करण्याकरिता संगणकाच्या मदतीने डबिंग करुन व्हायरल केल्याची ही तक्रार होती़ त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध सोमवारीच ढोकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

तो व्हीडिओच खोटा : राजेनिंबाळकरज्या व्हीडिओवरुन माझ्यावर गुन्हा दाखल झाला, तो व्हीडिओच मुळात खोटा आहे़ याबाबत आपल्या तक्रारीवरुन गुन्हाही दाखल झाला आहे़ तरीही पोलिसांनी कश्याच्या आधारे गुन्हा दाखल केला, हे कळायला मार्ग नाही़ शिवाय, ज्या आदरणीय रवी गायकवाड यांच्यासाठी आपण गेल्या दोन निवडणुकांत रक्ताचे पाणी करुन प्रचार केला़ त्यांच्याकडून विरोधकांना मदत व्हावे, अशी कृती झाली याची खंत वाटत आहे़- ओम राजेनिंबाळकर, सेना उमेदवार

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019osmanabad-pcउस्मानाबादShiv Senaशिवसेना