बुधवारी सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंचपदासाठी बाबा जाफरी पॅनलकडून सोमनाथ संजय कुंभार तर विरोधी पॅनलकडून संगीता प्रकाश चौहान यांनी अर्ज भरला होता. यात कुंभार यांना पंधरा तर चौहान यांना केवळ दोन मते मिळाली. यामुळे कुंभार बहुमताने विजयी झाले. जाफरी गटाच्याच इरफान गफार शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
या निवड कार्यक्रमात पॅनलप्रमुख बाबा जाफरी, नूतन ग्रामपंचायत सदस्य आशिफ शिलार, ओमशंकर टिकम्बरे, हिराजी गायकवाड,परशुराम देवकते, अशोक कांबळे, भाग्यश्री जाधव, कौसरबी पटेल, रंजना सातपुते, चाँदबी औटी, धोंडाबाई देवकते, संगीता आयवाळे, वर्षा पवार, वर्षा टिकाबरे, रवींद्र राठोड, संगीता चौहान यांच्यासह नजीर कमाल, अकबर बुडन, धीरज इंगळे, पंडित सातपुते हणमंत शिंदे, कय्युम चाकूरे, साहेब कमाल, तानाजी जाधव, कादर चिक्काळे, विठ्ठल फडताळे आदींची उपस्थिती होती. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पी. एस. चव्हाण, सतीश शेटगार यांनी काम पाहिले. निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.