शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या तुटवड्यामुळे कृषी केंद्रांवर झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

परंडा - खरीप हंगामासाठी उगवण क्षमतेसाठी विश्वसनीय असलेल्या नामांकित कंपनीच्या बियाणांचा परंडा तालुक्यात तुटवडा निर्माण झाला असून, ...

परंडा - खरीप हंगामासाठी उगवण क्षमतेसाठी विश्वसनीय असलेल्या नामांकित कंपनीच्या बियाणांचा परंडा तालुक्यात तुटवडा निर्माण झाला असून, खासापुरी चौकातील कृषी सेवा केंद्रावर गुरुवार बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत असल्याने या कोरोना नियमांचा व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

अद्यापही तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाला नसला तरीही शेतकरी बी-बियाणांची आगाऊ बेगमी करून ठेवत आहेत तर काही शेतकऱ्यांची कोरड्या भुईवर खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. तालुक्यात सर्वाधिक खरिपाचे क्षेत्र आहे. या पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. या पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी सर्वतोपरीने प्रयत्न करतात. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांच्या बियाणांची टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बाहेरील जिल्ह्यांतून बियाणे आणू लागले आहेत. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करूनही बियाणे उगवले नव्हते. परिणामी शेतकऱ्यांना माेठा आर्थिक फटका बसला हाेता. भरपाई मिळावी, म्हणून पंचनामे करून प्रस्ताव कृषी कार्यालयाकडे सादर करण्यात आले हाेते. परंतु, त्याचाही फारसा फायदा झाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. दरम्यान, अशा स्वरूपाचा धाेका यंदा हाेऊ नये, म्हणून शेतकरी नामांकित कंपन्यांच्या बियाण्याला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे एखाद्या कृषी केंद्रांवर असे बियाणे उपलब्ध असल्यास लाेक शेतकरी गर्दी करत आहेत. अशावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेताना दिसत नाही.