शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पावणेसहाशेवर थकबाकीदार गाळेधारकांना नगरपरिषदेकडून दुसऱ्यांदा नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 15:12 IST

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक, तुळजापूर नाका, देशपांडे स्टँड, नेहरू चाैक आदी भागांत जवळपास पाच काॅम्प्लेक्स उभे केले आहेत.

ठळक मुद्देभाड्याचे पाच काेटी रुपये थकीत अन्यथा पालिका गाळे करणार ‘सील’

उस्मानाबाद : व्यापाऱ्यांची गैरसाेय दूर व्हावी, यासाठी नगरपरिषदेकडून शहराच्या विविध भागांत व्यापारी संकुले उभारली. यातील पावणेसहाशेवर गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत, परंतु अनेकांकडून नियमित भाडे पालिकेला भरले जात नाही. त्यामुळे थकबाकीचा डाेंगर वाढत जाऊन सुमारे पाच काेटी झाला आहे. थकीत रक्कम भरणा करावी, यासाठी पालिकेकडून गाळेधारकांना नाेटीस देण्यात आली, परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, आता दुसरी नाेटीस देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास गाळे ‘सील’ करण्यात येणार आहेत.

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक, तुळजापूर नाका, देशपांडे स्टँड, नेहरू चाैक आदी भागांत जवळपास पाच काॅम्प्लेक्स उभे केले आहेत. यातील तब्बल ५८५ गाळे व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात बहुतांश गाळेधारक नियमित भाडे भरत हाेते, परंतु कालांतराने आजघडीला थकीत भाडे व त्यावरील व्याज मिळून सुमारे पाच काेटी रुपये थकबाकी झाली आहे. मार्चअखेरच्या अनुषंगाने पालिकेकडून कर वसुली माेहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गतच सुमारे पावणेसहाशेवर व्यापाऱ्यांना पालिकेने नाेटिसा देऊन थकबाकी भरण्याबाबत सूचना केली हाेती, परंतु या नाेटिशीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा दुसरी नाेटीस बजावली आहे. थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्याकडील रक्कम ३१ मार्चपूर्वी भरणा करावी, असे त्यात म्हटले आहे. यानंतरही ज्या गाळेधारकांनी थकबाकी भरलेली नसेल, त्यांचे गाळे थेट सील करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

पालिकेकडून नाेटिसा बजावण्यात आल्यानंतर, अनेकांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने, दुबार नाेटिसा देण्यात आल्या आहेत. यानंतरही म्हणजेच ३१ मार्चअखेर जे गाळेधारक थकबाकीत असतील, त्यांचे गाळे सील करण्यात येणार आहेत. थकबाकी भरणे गाळेधारकांच्या आवाक्यात यावे, यासाठी सवलतही देण्यात आली आहे.- हरिकल्याण येलगट्टे, सीओ, नगरपरिषद, उस्मानाबाद

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादTaxकर