(फोटो - ०३)
बलसूर : उमरगा तालुक्यातील जकेकूर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात आदिती माने, नम्रता कांबळे या विद्यार्थिनींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. टी. घोडके, सहशिक्षक प्रदीपकुमार समाने, सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय बिराजदार, संतोष कांबळे, संतोष बिराजदार, पटेल नासीर, सय्यद इरशाद, एम. सी. स्वामी, विद्यार्थी उपस्थित होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय
लोहारा : शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय व शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन पर्यवेक्षक बी. एल. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंकुश शिंदे, प्रा. यू. व्ही. सोमवंशी, डॉ. विनोद आचार्य, प्रा. डी. एन. कोटरंगे, ए. एस. गोरे, एस. टी. मोरे उपस्थित होते.
महात्मा फुले युवा मंच
लोहारा : शहरात महात्मा फुले युवा मंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने माजी जि. प. सदस्या मीरा माळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. विनोद आचार्य, आयन्नौद्दीन सवार, अविनाश माळी, सुग्रीव क्षीरसागर, प्रा. डी. एन. कोटरंगे, सोनाली काटे, वैष्णवी क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी, अमोल माळी, सोमनाथ भोजने, राजेंद्र क्षीरसागर, सोमनाथ माळी, अशोक क्षीरसागर, नरहरी क्षीरसागर, अशोक काटे, बंटी माळी, सुजाता क्षीरसागर, मंगल क्षीरसागर, महादेवी फुलसुंदर, निर्मला क्षीरसागर, सुनीता फुलसुंदर, ऋतुजा फुलसुंदर, आर्या फुलसुंदर यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या.
हराळी येथे विविध स्पर्धा
लोहारा : तालुक्यातील हराळी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मुलांची वेशभूषा स्पर्धा, मुलींच्या जन्माचे स्वागत, सावित्रीबाई फुले जागर स्त्री शक्तीचा गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी लोहारा पोलीस अधीक्षक धर्मसिंग चव्हाण, पर्यवेक्षिका माया जमादार, डॉ. संतोष मनाळे, अजित रणखांब, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा रंजना हासुरे, पांचाळ, पोलीस पाटील नितीन सोनवणे, संगीता सूर्यवंशी, अंगणवाडी सेविका निर्मला सूर्यवंशी, सुवर्ण सूर्यवंशी, फराजनबी शेख, उर्मिला कस्तुरे, लक्ष्मी मुगळे, भारत हाके, विद्यार्थी माता-पालक, महिला उपस्थित होत्या. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्ते यांचा सावित्री जिजाऊ फोटो देऊन अंगणवाडीच्या वतीने सन्मान करण्यात आला.