सोन्ने हे मागील २१ वर्षांपासून गावच्या सरपंच, उपसरपंच या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी त्यांची मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. उस्मानाबाद जि.प. च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आ. कैलास पाटील, जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि. प.चे माजी अध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील, उद्योजक प्रवीण रणबागुल, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तात्यासाहेब गाेरे, जि. प. सदस्य संदीप मडके, उद्धव साळवी, भूम पं. स.चे उपसभापती बालाजी गुंजाळ, सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्यध्यक्ष जितेंद्र भोसले, महिला राज्याध्यक्ष जिनत सय्यद, प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घायाळ, सहसचिव सुशील तौर, संदीप देशमुख, कोहिनूर सय्यद यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
सरपंच परिषदेच्या मराठवाडा अध्यक्षपदी सतीश सोन्ने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST