शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

१० हजारांवर थाळ्यांतून गरजूंचे पोट तृप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

उस्मानाबाद : दुसऱ्या लाटेवेळी पडलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या नातेवाइकांचे बाहेर जेवणासाठी हाल सुरू होते. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने ...

उस्मानाबाद : दुसऱ्या लाटेवेळी पडलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या नातेवाइकांचे बाहेर जेवणासाठी हाल सुरू होते. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने जिल्हा रुग्णालयाजवळ मोफत भोजन सेवेचा उपक्रम सुरू करण्यात आला. महिनाभराच्या काळात १० हजारांहून अधिक थाळ्यांचे वितरण करून या उपक्रमाद्वारे गरजूंचे पोट तृप्त करण्यात आले.

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार बसवराज पाटील यांच्या सूचनेनुसार उस्मानाबाद शहर काँग्रेसच्या वतीने कोरोना काळात नागरिकांची जेवणाची व्यवस्था व्हावी, या हेतूने उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयाजवळ १३ मे पासून मोफत भोजन सेवा सुरू करण्यात आली होती. एक महिना अविरतपणे हा अन्नदानाचा यज्ञ चालविण्यात आला. ३२ दिवस चाललेल्या या उपक्रमात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत रुग्णांचे नातेवाईक व इतर गरजू नागरिकांना पोटभर जेवण व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. यादरम्यान दररोज सरासरी ३५० नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील रुग्ण उपचार घेत होते. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक होती. त्यांची जेवण व पिण्याच्या पाण्याची चांगली सोय या उपक्रमातून झाली. या उपक्रमास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. दरम्यान, आता रुग्ण कमी झाल्याने या उपक्रमाची रविवारी सांगता करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आशिष मोदाणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला काँग्रेसच्या डॉ.स्मिता शहापूरकर, माजी नगरसेवक सय्यद नादेरउल्ला हुसैनी, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, राज कुलकर्णी, धनंजय राऊत, युवक काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर, अभिषेक बागल, सुरेंद्र पाटील, अतुल देशमुख, अब्दुल लतीफ, संजय गजधने, सचिन धाकतोडे, प्रेम सपकाळ, सुधीर अलकुंटे यांनी परिश्रम घेतले.