शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रानकवी महानोरांच्या हस्ते होणार उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 19:30 IST

साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११ व १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे.

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे.हे संमेलन अधिकाधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे.

उस्मानाबाद : ९३ वे अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलन येत्या जानेवारी महिन्यात उस्मानाबाद येथे होऊ घातले आहे़ या संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना़धों़ महानोर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शुक्रवारी स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली़

साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११ व १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे. या संमेलनाचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जय्यत तयारी केली आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे. हे संमेलन अधिकाधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून जगभरातील मराठी भाषाप्रेमींवर आपल्या साहित्यप्रतिभेने मोहिनी घातलेले ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते.

उस्मानाबादकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्घाटन सोहळ्यास येण्याचे मान्य केल्याचेही स्वागताध्यक्ष तावडे म्हणाले़ महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली अजिंठा, कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्ष्यांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, यशवंतराव चव्हाण, रानातल्या कविता, शरद पवार आणि मी, शेती, आत्मनाश व संजीवन ही पुस्तके वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ही गाणी महाराष्ट्रातील तरुणांसह सर्वच रसिकजनांच्या ओठी आजही रेंगाळतात. 

संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यातना. धों. महानोर यांना भारत सरकारने १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. सन २००० साली त्यांच्या पानझड या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार आणि २००९ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संमेलनात तीन दिवस चालणाऱ्या विचारमंथनातून साहित्यप्रतिभेला नवी दिशा मिळणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार असल्याचेही नितीन तावडे म्हणाले़ 

टॅग्स :marathiमराठीMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनOsmanabadउस्मानाबादliteratureसाहित्य