शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माळुंब्रा येथील रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

तुळजापूर : तालुक्यातील माळुंब्रा येथे पाझर तलावाच्या निर्मितीनंतर शेताकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. याबाबत शेतकऱ्यांनी ...

तुळजापूर : तालुक्यातील माळुंब्रा येथे पाझर तलावाच्या निर्मितीनंतर शेताकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. याबाबत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर कार्यालयात सुनवण्या घेऊन महसूल विभागाने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सामंजस्यपणातून दीड कि.मी चा नवीन रस्ता करून दिला. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतीची कामे खोळंबली जात होती. शिवाय, दुसऱ्याच्या शेतीतून शेतकरी जाऊ देत नसल्याने दत्तात्रय त्रिंबक माने यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे नवीन रस्ता मिळण्यासाठी पाठपुरावा केला. यावर तहसील कार्यालयात सुनावण्या घेण्यात आल्या. यानंतर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांनी मंडळ अधिकारी यादव, तलाठी यांच्या समवेत शेतीवर जाऊन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधत चर्चा केली. अखेर सामंजस्यातून हा दीड कि.मी.चा नवीन शेत रस्ता तयार करण्यात आला.