शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दोघा कर्मचाऱ्यांवर चालतोय निबंधक कार्यालयाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:29 IST

भूम : शहरातील सहायक निबंधक कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर असले तरी शिपायासह इतर दोन पदे रिक्त आहेत. ...

भूम : शहरातील सहायक निबंधक कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर असले तरी शिपायासह इतर दोन पदे रिक्त आहेत. शिवाय, एक अधिकारी जिल्हा कार्यालयात वर्ग झाल्यामुळे सध्या दोघांवरच या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. परिणामी अवैध सावकारकींच्या तक्रारींवरील कारवाईसह इतरही अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.

शहारासह तालुक्यात २२४ संस्था, २७ सावकार व पतसंस्था आहेत. या सर्वांचा कारभार सांभाळण्यासोबतच पीक कर्जवाटप, पीककर्जावरील व्याज माफीचे महत्त्वाचे कामदेखील या कार्यालयामार्फत केले जाते. विशेषत: अवैध सावकारीला आळा घालण्याची जबाबदारी या कार्यालयावर आहे. परंतू, ही सर्व कामे करण्यासाठी आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध नाही. कर्मचारी नसल्याने आजवर अवैध सावकारकीच्या १८ तक्रारी पेंडिंग आहेत. या कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर आहेत. यापैकी जुलै २०२० पासून या कार्यालयातील शिपाईपद रिक्त आहे. यामुळे कार्यालय साफ सफाई होत नसल्याने कार्यालयात दुर्गंधी देखील पसरली आहे. पर्यायाने येथे काम करणाऱ्या व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या कार्यालयात सहायक सहकार हे २०१७ मध्ये रुजू झाले. परंतु, रुजू झाल्यापासून ते उस्मानाबाद येथील डीडीआर कार्यालयात सेवावर्ग झाले आहेत. त्यामुळे पगार या कार्यालयातून निघत असला तरी त्यांना सेवा मात्र उस्मानाबादला बजावावी लागत आहे. याशिवाय कनिष्ठ लिपिक, सहकार अधिकारी श्रेणी-१ ही दोन पदेदेखील रिक्त आहेत. याचा परिणाम कामावर होत असून, उपलब्ध दोघा कर्मचाऱ्यांनाच तारेवरची कसरत करीत कारभार हाकावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.

चौकट

अनेक कामे खोळंबली

शासनाच्या वतीने तालुक्यासह शहरातील नागरिकांचे संस्था नोंदणी प्रकरणे, सावकारी लायसन्स, सावकारी तक्रारी, शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याबाबत मदत, शेतकऱ्यांची कर्ज माफी, शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत व्याज व अनुदान सवलत ही सर्व कामे वेळेत व तातडीने मार्गी लागावीत याकरिता सहायक निबंधक कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, कर्मचारी अपुरी संख्या असल्याने शेतकऱ्यास अनेक कामे खोळंबली आहेत. सहायक निबंधक व मुख्य लिपिक हे दोनच कर्मचारी असल्याने या कार्यालयाचा पत्रव्यवहारदेखील यांनाच करावा लागत आहे.

पाच दिवस कार्यालय बंद

तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी प्रशासनाने विविध भागातील कर्मचाऱ्यांसोबतच दोघांवर भार असलेल्या सहायक निबंधक कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांनादेखील निवडणूक कर्तव्यावर घेतले. त्यामुळे या कालावधीत पाच दिवस हे कार्यालय चक्क बंद राहिले. या कालावधीत नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.