शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटाला गाडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:31 IST

कळंब (जि.उस्मानाबाद) : राज्य सध्या आरोग्यविषयक संकटात आहे. अशाप्रसंगी याचे राजकारण कोणीही करू नये. उस्मानाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीत ...

कळंब (जि.उस्मानाबाद) : राज्य सध्या आरोग्यविषयक संकटात आहे. अशाप्रसंगी याचे राजकारण कोणीही करू नये. उस्मानाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीत राज्यातील चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळाले आहे. हेही नसे थोडके. अडचणीच्या काळात मतभेद बाजूला ठेवत महाराष्ट्र एकत्र येतो व संकटाला गाडतो, असे उद‌्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथील व्हर्च्युअल सोहळ्यात काढले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली असून, हे ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे व्हर्च्युअली उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे रक्तातील साखर वाढत आहे. अशावेळी साखर कारखानेच मदतीला पुढे येत आहेत, हा योगायोगच. धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प हा ऑक्सिजनचा नव्हे तर जीव वाचविण्याचा आहे. राज्यात चाचण्या व बेडची संख्या वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. टेस्टसंदर्भात अधिक सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या संकटावर महाराष्ट्र मात करेल, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील, शंकरराव गडाख यांनीही मनोगते व्यक्त करून कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले.

प्रत्येक जिल्ह्यात हवेत प्रकल्प : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिक्विड ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भातील अडचणी मांडत भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारे असे प्रकल्प उभारावे लागतील, असे सुचविले. तसेच देशातील २० टक्के साखर इथेनॉलमध्ये उपयोगात आणल्यास ६० लाख टन साठा वापरात येईल. यामुळे गोडाउनमध्ये बसून असलेल्या साखरेवरील व्याजाचा भुर्दंड कमी होईल. याकडेही कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.