शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

महाविद्यालयात भित्तिपत्रिकेचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती होऊन इतिहासाची गोडी निर्माण ...

उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती होऊन इतिहासाची गोडी निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे प्रकाशन प्राचार्य डाॅ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. सूत्रसंचालन भैरवनाथ माकोडे यांनी केले. आभार वैभवी कोकाटे हिने मानले. यावेळी प्रा. नील नागभिडे, प्रा. विकास सरनाईक, प्रा. डाॅ. केशव क्षीरसागर व इतिहास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

--------------

उमरगा येथे गुणवंतांचा सत्कार

(फोटो : गुणवंत जाधवर 21)

उमरगा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्ष शकुंतला मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार, नगरसेवक पंढरीनाथ कोणे आदी उपस्थित होते. यावेळी चौथी एमटीएस परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या पृथ्वीराज दगडोपंत फुगटे, तिसरी एमटीएसमध्ये राज्यात दुसर्‍या आलेल्या सुयश काळे, आठव्या स्कॉलरशिप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या श्रेयश आळंगेकर, जिल्ह्यात प्रथम आलेला अर्णव तोडकर, चाणक्य बावा, पवन गायकवाड यांच्यासह तालुक्यातील ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्तविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे,तर सूत्रसंचालन प्रवीण स्वामी यांनी केले. आभार धनराज कुडकले यांनी मानले.

———————————————

विजय गायकवाड यांची नियुक्ती

(फोटो - विजय गायकवाड २१)

उस्मानाबाद - मानवाधिकार व सामाजिक न्याय मिशन या संघटनेच्या चीफ रिपार्टिंग ऑफिसर पदावर विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश दापके, जिल्हाध्यक्ष ॲड. झिनत प्रधान, मुख्य सचिव ॲड. विश्वजित शिंदे, तब्बसुम सय्यद यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ॲड. निलेश प्रधान, ॲड. डी. पी. कांबळे, विजय माने, रोहन मोरे, संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

———————————————

संस्कृती बोराडेने पटकाविले सुवर्णपदक

फोटो (२२-२) नानासाहेब बोराडे

उस्मानाबाद : २१ फेब्रुवारी रोजी येथील तुळजाभवानी स्टेडियमवर जिल्हा स्केटिंग असोसिएशनतर्फे आयोजित ‘स्पीड’ अंडर ९ या प्रकारात संस्कृती नानासाहेब बोराडे हिने सुवर्णपदक मिळवले. तिला उस्मानाबाद जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. जयंत जगदाळे, सचिव व कोच प्रवीण गडदे, कैलास लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

————-

फोटो (२२-२) दीपक जाधव

फेरोज पल्ला यांचा सन्मानपत्राने गौरव

उस्मानाबाद : गरजू रुग्णांना सातत्याने मदत करणारे येथील अंजुमन हेल्थ केअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्राने गौरविण्यात आले. शहरातील वैरागरोड येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित सर्वरोगनिदान शिबिराप्रसंगी आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के. पाटील हे होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहमद खान, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, डीवायएसपी मोतीचंद राठोड, तालुका आरोग्य अधिकारी ऐवळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, डॉ. किरण गरड, शहजाद वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष गफार शेख, सामाजिक कार्यकर्ते अजहर चाँद शेख आदी उपस्थित होते.

——————————-

सुरतगाव येथील रस्त्याचे काम सुरू

(फोटो - संतोष मगर 23)

तामलवाडी : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील भीमनगरमध्ये सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच द्रौपदीताई गुंड, उपसरपंच बाबासाहेब गुंड, ग्रा. पं. सदस्य सागर गुंड, शहाजी पाटील, नवनाथ सुरते, विजय देवकर, राम गुंड, मुरलीधर कटारे, सौदागर गुंड, ग्रामसेवक बापूसाहेब दराडे, बापू गुंड यांच्यासह न्यू गौतम तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

--------------

‘गीतरामायण’ कार्यक्रमातून १५ हजारांचा निधी

फोटो (२२-२) शेषनाथ वाघ

उस्मानाबाद : श्रीराम मंदिर निर्माण अयोध्या निधी संकलन अभियानात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान संस्कार भारती जिल्हा समितीद्वारा ‘गीतरामायण’ कार्यक्रमातून एकूण १५ हजार ५२७ रुपये निधी संकलित करण्यात आला. सदरील रक्कम नुकतीच संस्कार भारती जिल्हा समितीकडे सुपुर्द करण्यात आली. याप्रसंगी श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान पदाधिकारी सतीश रंगनाथ कोळगे, महेश वडगावकर, संस्कार भारतीचे सुधीर कुलकर्णी, अनिल ढगे, शेषनाथ वाघ, श्यामसुंदर भन्साळी, सुरेश वाघमारे, सुंभेकर, शरद वडगावकर, महादेव केसकर आदी उपस्थित होते.

--------------