शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चातून सगळ्या सुविधा देतो, पण उपचारात हयगय करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

परंडा : कोरोना रूग्णांच्या उपचारात कसलीही हयगय केलेली खपवून घेतली जाणार नाही. त्याकरिता शासनावर अवलंबून न राहता काय पाहिजे ...

परंडा : कोरोना रूग्णांच्या उपचारात कसलीही हयगय केलेली खपवून घेतली जाणार नाही. त्याकरिता शासनावर अवलंबून न राहता काय पाहिजे ते मला सांगा, मी स्वखर्चाने सर्व औषधे व साहित्य पुरवितो, असे आश्वासन आ. प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांनी येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डाॅ. अबरार पठाण यांना दिले.

आ. डाॅ. सावंत यांनी मंगळवारी वाशी, भूम, परंडा तालुक्यांचा धावता दाैरा केला. यावेळी त्यांनी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोरोना केंद्र, उपजिल्हा रूग्णालयास भेट देऊन सुविधा व गैरसोयींची पाहणी केली. तसेच डाॅ. अबरार पठाण यांच्याशी चर्चा केली. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असून, डाॅक्टर व इतर मनुष्यबळही कमी असल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आल्यावर सावंत म्हणाले, खाजगी क्षेत्रातून मनुष्यबळ मागवा. त्यांच्या पगारी आम्ही करू. औषधी मिळत नाहीत म्हणून गप्प न बसता अडचणी आम्हाला सांगा, त्या मी दूर करेन. तसेच खाजगी क्षेत्रातील मनुष्यबळ मागवा. त्यांना ‘भैरवनाथ’कडून दुप्पट पगारी देऊ, असेही सावंत यावेळी म्हणाले. ‘भगवान भरोसे’ रूग्ण सोडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार अनिलकुमार होळकर, जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुधन विकास सभापती दत्ता साळुंके, गटविकास अधिकारी किशोर अंधारे, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे, प्रा. तानाजी सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गाैतम लटके, तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, न. प. मुख्याधिकारी दिपक इंगोले, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे आदी उपस्थित हाेते. दरम्यान, परंडा व शहरातील चित्र चिंताजनक असून, संचारबंदी व लाॅकडाऊन असतानाही सगळीकडे दुचाकी व चार चाकी वाहनातून नागरिक खुलेआम फिरताना दिसत आहेत. अशाने कोरोना कसा रोखला जाईल व चैन कशी ब्रेक होईल, असा सवाल करून संचालबंदीतील स्वैर संचाराबद्दल आ. सावंत यांनी चिंता व्यक्त केली.