शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मानधनवाढीचे आश्वासन दोन महिन्यानंतरही हवेतच; पुन्हा संप, राज्यात ७२ हजार आशा, ३९०० गटप्रवर्तकांची परवड

By आशपाक पठाण | Updated: January 13, 2024 18:58 IST

गावस्तरावर राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम आशांकडून केले जात आहे.

धाराशिव: राज्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना काम जास्त अन् मोबदला कमी अशी अवस्था झाल्याने दोन महिन्यांपूर्वी पुकारण्यात आलेल्या संपात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मानवाढीचे आश्वासन दिले. तद्नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीसह अन्य प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, दोन महिने लोटले तरी अद्याप त्यावर शासन निर्णय होत नसल्याने ७२ हजार आशा व ३ हजार ९०० गटप्रवर्तकांमध्ये नाराजी वाढली असून शुक्रवारपासून पुन्हा संप सुरू केला आहे.

गावस्तरावर राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम आशांकडून केले जात आहे. क्षयरोग, कुष्ठरोग रूग्ण शोध मोहिम, गरोदर माता, लसीकरण, कुपोषण, प्रसुती, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड ऑनलाईन काढणे, गावात आरोग्यविषयक काही शासनाचे उपक्रम आले की सर्वप्रथम लाभार्थ्यांचा दारात जाण्याचे काम आशा करीत आहेत. कोरोना काळात तर आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून जिवाची पर्वा न करता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा, गटप्रवर्तक यांनी गावस्तरावर खंबीरपणे काम केले. आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा, गटप्रवर्तकांची ओळख निर्माण झाली आहे. गावच्या आरोग्याची २४ तास काळजी घेणाऱ्या आशा, गटप्रवर्तकांना मानधनवाढीचे राज्य शासनाने दिलेले आश्वासन हवेत विरल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

काम वाढले, मानधनवाढीची नुसतीच चर्चा...आशा, गटप्रवर्तकांना मासिक मानधन वाढीची घोषणा करण्यात आली. आशा स्वयंसेविकांना मासिक ७ हजार रूपये व गटप्रवर्तकांना १० हजार रूपये, दिवाळीत २ हजारांची भाऊबीज देण्याचे आश्वासन संघटनेच्या बैठकीत देण्यात आले होते. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तुम्हाला पगार वाढली आता कोणतेही काम करावेच लागेल, असा तगादा लावला. अपेक्षेपोटी ऑनलाईन कामातही आशांनी जोर वाढविला. हिवाळी अधिवेशनात शासन अध्यादेश निघेल या अपेक्षेने बसलेल्या आशांची निराशा झाली आहे.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन...१ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुंबईत कृती समितीची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी आशांना दिवाळी भेट २ हजार, वाढीव ७ हजार, गटप्रवर्तकांना ६ हजार २०० देण्याचे आश्वासन दिले. गटप्रवर्तकांना मानधन कमी झाल्याने पुन्हा दहा दिवस संप केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रवर्तकांना १० हजार वाढ देण्याचे मान्य केले. दोन महिने झाले अजून आदेश निघाला नसल्याने शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Strikeसंप