शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांमधील वादातून दिवसभर वीज खंडित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

पाथरुड : भूम तालुक्यातील सर्वात मोठे विद्युत उपकेंद्र असलेल्या पाथरुड येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा बुधवारी ...

पाथरुड : भूम तालुक्यातील सर्वात मोठे विद्युत उपकेंद्र असलेल्या पाथरुड येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा बुधवारी ऑपरेटर व विद्युत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे दिवसभर खंडित राहिला. यामुळे पाथरुडसह परिसरातील जवळपास १५ गावांमधील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

पाथरुड ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून पाथरुडसह नान्नजवाडी, बागलवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, दुधोडी, सावरगाव, आनंदवाडी, नळीवडगाव, घुलेवाडी, अंतरवली, नळी अशा जवळपास १५ गावांना घरगुती व कृषीपंपासाठी विद्युत पुरवठा करण्यात येतो. बुधवारी येथील ऑपरेटर व विद्युत कर्मचारी यांच्यात काही कारणावरून मतभेद झाले. यातूनच चक्क दिवसभर उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा बंद राहिला. यामुळे लाॅकडाऊनमध्ये व उकाड्यात घरात थांबलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. कृषीपंपाचाही विद्युत पुरवठा खंडित असल्याने अनेकांच्या जनावरांनाही पाणी मिळाले नाही. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांकडून लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कोट......

पाथरूड येथील उपकेंद्रांमध्ये सर्व यंत्रचालक, ऑपरेटरचा मनमानी कारभार चालू आहे. सदर ऑपरेटर दोन ते तीन दिवस ड्यूटी करत असून, त्याच्यामुळे लाईनमनच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. यंत्रचालक गैरहजर असल्यामुळे स्वतः लाईनमन लाईट बंद करीत आहेत. यंत्रचालकाच्या हलगर्जीपणामुळे वीज ग्राहकांना सुरळीत वीज भेटत नाही.

- एन. के. बाराते, वरिष्ठ तंत्रज्ञ, पाथरूड

वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी परमिट न घेता विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे दिवसभर विद्युत पुरवठा बंद राहिला.

- आरती जाधव, ऑपरेटर,

ऑपरेटर व वरिष्ठ तंत्रज्ञ यांच्या वादामुळे पाथरूडमध्ये दिवसभर वीज पुरवठा बंद होता. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर देखील झााल. त्याच्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची चौकशी करावी.

- संजय केंद्रे, ग्रामविकास अधिकारी