शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हंकाळेश्वर’ची सत्ता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST

उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम परंडा : येथील पेशवा युवा मंच व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेचे नगरसेवक मकरंद ...

उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम

परंडा : येथील पेशवा युवा मंच व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेचे नगरसेवक मकरंद जोशी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलोफर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंचचे अध्यक्ष शुभम भातलवंडे जीवन विद्वत, किरण वैद्य, रवी वैद्य, जयेश विद्वत, आदित्य विद्वत रोहित भोत्रेकर, तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात श्रमदान केले.

मदतीसाठी शासन उपाययोजना करणार

उस्मानाबाद : मराठा आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडत असल्याचे सांगून आरक्षणासाठी बलिदान दिलल्यांच्या वारसदारांना शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी शासन उपाययोजना करणार असल्याची माहिती नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आरक्षणासाठी दिलेल्या कुटुंबियांनी शिंदे यांची भेट घेऊन आरक्षण व मदतीबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

माणकेश्वरमध्ये विजयाचा जल्लोष

माणकेश्वर : येथील ग्रामपंचायतीवर स्व. बापूसाहेब आंधारे जनविकास आघाडीचे १२, तर परिवर्तन विकास आघाडीचा १ उमेदवार विजयी झाला. यामुळे येथे समर्थकांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांमध्ये विशाल कातुरे, मंदाकिनी माळी, शेख नसरीन शेर मोहम्मद, विशाल अंधारे, नंदा सुदाम पवार, भाऊसाहेब अंधारे, शामल कोळेकर, कल्याण देवकते, विमल मच्छिंद्र अंधारे, बादला सलमाबी नासर, नंदुबाई प्रभाकर तेलंगे, सुरेखा भाऊसाहेब अंधारे व शफिक शिकलकर यांचा समावेश आहे.

शंभर टक्क्यांप्रमाणे वेतनाची मागणी

तुळजापूर : राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना १०० टक्क्यांप्रमाणे वेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष अशोक शेंडगे, जिल्हाध्यक्ष शाम कोळी, मार्गदर्शक शंकर घंटे, जयंत इंदापूरकर, संभाजी पडवळ, विश्वंभर माने, जिल्हा सरचिटणीस उमाकांत देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड, सल्लागार मनोज भोयटे, संतोष खंगले, मधुकर खिल्लारे, बालाजी कानडे, लहू लोमटे, राजेंद्र धावारे आदी उपस्थित होते.