शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

तिरंगी, चौरंगी लढतीची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST

लोहारा : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तालुक्यात एकदिलाने काम केले. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ...

लोहारा : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तालुक्यात एकदिलाने काम केले. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये लढत होणार असल्याने स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे चित्र आहे.कोरोनामुळे निवडणूक आयोगाने ऑक्टोबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला. त्यामुळे लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतीवर प्रशासकाच्या नियुक्ती करण्यात आल्या. यामुळे निवडणुका कधी होतात. याकडे गावपुढारी डोळे लावून बसले होते. त्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि गावागावात कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याचे तसेच सरपंचपदासाठीचा उमेदवाराचे शिक्षण किमान सातवी असणे बंधनकारक केल्यानेही पॅनलप्रमुखांची चांगलीच गोची झाली आहे.

राज्यात शिवसेना,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांचा प्रचार तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकदिलाने केला. यातील विजयामुळे महाविकास आघाडीतील नेत्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. परंतु, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमधील पक्षातील कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यात निवडणूक होऊ घातलेल्या २६ ग्रामपंचायतमध्ये भाजपाचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होणार असल्याचे चित्र स्पष्ट असले तरी बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये शिवसेना व कॉंग्रेसमध्ये दुरंगी सामना रंगणार आहे. यामुळे मात्र स्थानिक पातळीवर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावस्तरांवर आपल्या पक्षाची, नेत्यांची बाजू खंबीरपणे सांभाळणारा कार्यकर्ता मात्र आता या निवडणुकीत एकटा पडणार आहे.

चौकट....

या ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक

लोहारा तालुक्यातील आरणी, कानेगाव,भातागळी, कास्ती बु ,कास्ती खुर्द,मार्डी, लोहारा खुर्द, राजेगाव, एकोंडी लो, मुर्शदपूर, उदतपूर, तावशीगड, चिंचोली काटे, मोघा, बेलवाडी,हराळी, कोंडजीगड, करवंजी, हिप्परगा सय्यद, फणेपुर, भोसगा, आष्टाकासार, होळी, दस्तापूर, धानुरी व करजगाव या २६ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत.

बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू

तालुक्यातील फणेपूर, आरणी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे यापुढेही या ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी गावस्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. लोहारा खुर्दही बिनविरोध काढण्यात आली होती. परंतु, आयत्यावेळी दोन जागेसाठी निवडणुका झाल्या. परंतु, येथील सरपंच, उपसरपंच निवड मात्र बिनविरोध झाली. सध्या बिनविरोध काढण्यासाठी दोन वेळा सर्वपक्षीय बैठका झाल्या असून त्यात बऱ्यापैकी यश आल्याने बिनविरोधाची आशा वर्तवली जात आहे. तसेच राजेगावातही बिनविरोधासाठी सर्वपक्षीय बैठक झाली असून, या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.