शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दाळिंबचा रस जाफरींच्या पेल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST

तुरोरी : तुरोरी येथे सत्ताधारी सेना-भाजपच्या विरोधात व्यापारी महासंघाने पॅनल उभा केले होते. तर काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतली होती. ...

तुरोरी : तुरोरी येथे सत्ताधारी सेना-भाजपच्या विरोधात व्यापारी महासंघाने पॅनल उभा केले होते. तर काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतली होती. निवडणूक रिंगणात आठ अपक्षही होते. त्यांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवीत पूर्ण जोर लावला. निकालात काँग्रेसने पाठिंबा दिलेले आठपैकी सात अपक्ष, सेना-भाजपचे ८ व ज्यांचा मोठा गाजावाजा झाला होता त्या व्यापारी महासंघाचे फक्त दोन सदस्य निवडून आले. येथे निवडणुकीत कुणाच्याही ध्यानीमनी नसलेली काँग्रेस, व्यापारी महासंघाच्या दोन सदस्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापू शकते.

गुंजोटी : उमरगा तालुक्यातील मोठे गाव असलेल्या गुंजोटी येथे सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादीचा शिवसेनेने सपशेल पराभव केला. सेनेच्या एम.एस. सुलतान यांनी प्रतिष्ठा पणाला लावून सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेसकडून माजी सरपंच शंकर पाटील, सिद्राम देशमुख यांनीही प्रचाराची धुरा सांभाळत धुरळा उडविला होता. मात्र, जनतेचा कौल आपल्या बाजूने वळविण्यात त्यांना यश मिळाले नाही. गुंजोटीत शिवसेना १२, काँग्रेस २, भाजप १, माजी सैनिक १ व एका अपक्षास संधी मिळाली आहे.

कुन्हाळी : गेल्यावेळी गावातील सत्ता विरोधकांच्या हाती गेली असतानाही विरोधकांचे सदस्य आपल्या बाजूने वळवून ग्रामपंचायत ताब्यात ठेवल्यानंतर यावेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावून काँग्रेसचे जि.प. सदस्य प्रकाश आष्टे यांनी कुन्हाळी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळविली आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादी यांच्या आघाडीला २ तर अपक्षांनाही २ जागेवर यश मिळाले. काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवीत सत्ता प्राप्त केली.