मुरूम पोलिसांचे चार ठिकाणी छापे
मुरूम : येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने २५ डिसेंबर रोजी वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे टाकून अवैध दारू बाळणाऱ्यांवर कारवाई केली. तुगाव येथील भीम नगर भागात शिवराज करगले (रा. तुगाव) हे पाच लिटर गावठी दारूसह पथकास मिळून आले. तसेच महालिंगरायवाडी येथे तुकाराम चव्हाण, सुंदरवाडी येथे श्रावण सुरवसे तर दाळींब येथे गंगाराम वाठोड हे देखील गावठी दारूसह पथकास आढळले. याप्रकरणी या सर्वांविरुध्द स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
नळदुर्ग : ट्रॅक्टर अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी नंदगाव येथील रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हंजगी (ता. अक्कलकोट) येथल दाऊत रशीद मुल्ला याने २३ डिसेंबर रोजी नंदगाव येथील रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रेलर निषचकाळजीपणे चालविल्याने तेआदळून चालक दाऊत हा ट्रॅक्टरबाहेर फेकला गेला. यावेळी ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने यात त्याचा मृत्यू झाला. चौकशीअंती पोहेकॉ भीमराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात मयत चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेवर कारवाई
कळंब : येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने २५ डिसेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात अंजनाबाई काळे (रा. पारधी पेढी, आंदोरा) या त्यांच्या राहत्या घरी विदेशी व गावठी दारू बाळगल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदी बाळगली
उमरगा : शिंदी हे अंमलीद्रव्य बाळगल्या प्रकरणी उमरगा पोलिसांनी एकाविरुध्द कारवाई केली. २५ डिसेंबर रोजी एकोंडी येथे नागराळ रस्त्याच्या बाजुला भीमय्या तेलंग हा १२ लिटर शिंदीसह पोलिसांना अाढळून आला. त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.