शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला; तरी आम्हाला काहीच कसे वाटत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलांच्या दरासोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. असे असताना या वाढत्या महागाईचे ...

उस्मानाबाद : गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलांच्या दरासोबतच पेट्रोल व डिझेलचेही दर गगनाला भिडले आहेत. असे असताना या वाढत्या महागाईचे कुणालाच काही वाटत नसल्याचे दिसत आहे.

पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर आंदोलने व्हायची. आता मात्र विरोधी राजकीय पक्ष किंवा एकही सामाजिक संघटना आवाज उठवायला तयार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीपासून खाद्य तेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे गोरगरीब तथा सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे. यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

असे असताना दरवाढीच्या प्रश्नावर विरोधी राजकीय पक्षांमधील कुणी पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा सामाजिक संघटनांनी अद्याप आंदोलनाची हाक दिलेली नाही.

कोट...

राज्यभरात कोणत्याही ज्वलंत प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी पक्षाकडून सूचना येत असतात. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे आंदोलने झालेली नाहीत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम ठरणार आहेत.

रवींद्र इंगळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोरोनाच्या सावटाखाली शासनाकडून पेट्रोल, डिझेलचे वाढविण्यात येणारे दर सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करणारे आहेत. वाहनधारकांची यामुळे आर्थिक कोंडी होत असून, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल,

दादा कांबळे, जिल्हा सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

माझ्याकडे तीन माल वाहतूक टेम्पो आहेत. लॉकडाऊन काळात वाहनांची चाके थांबली होती. त्यामुळे वाहन चालक व मालकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. सध्या वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. शासनाने पेट्राेल, डिझेलचे दर कमी करावेत.

आकाश सुरवसे, वाहन मालक

लॉकडाऊन काळात ३ ते ४ महिने ॲटोरिक्षा बंदच होत्या. त्यामुळे या कालावधीत ॲटोरिक्षा मालक व चालकांची आर्थिक कोंडी झाली होती. सध्या सर्व व्यवसाय, उद्योग पूर्वपदावर येऊ लागले आहेत. यात शासनाकडून पेट्रोल, डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केली जात आहे. दिवसाकाठी ४०० रुपये व्यवसाय झाला तर यातील २०० रुपये पेट्रोलवर खर्च होत आहेत.

जमाल तांबोळी, रिक्षा चालक

इंधन दरवाढीचा बाजारपेठेवर परिणाम

पेट्रोल, डिझेलचे दर प्रतिदिन वाढत आहेत. याचा परिणाम ट्रान्सपोर्ट सेवेवर होत असल्याने जीवनाश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. किराणा साहित्यासह, बांधकामाच्या साहित्यातही वाढ झाली आहे. शिवाय, खासगी वाहनधारकांनी वाहनांचे भाडे वाढविले आहे. याची झळ सर्वसामान्य व्यक्तिंना बसत आहे.

इंधनाचे दर वाढल्यामुळे फळांच्या दरातही वाढ झाली आहे. कपडे, शूजच्या वस्तूही काहीअंशी वाढल्या आहेत. वाढत्या दरामुळे अनेकांनी वाहनांऐवजी सायकल वापरण्यास प्राधान्य दिले आहे. मागील पाच सहा महिन्यांपासून अडगळीत पडलेल्या सायकल आता रस्त्यावर आल्या आहेत.